Homeताज्या बातम्यादेश

वायुदलाचं ट्रेनर विमान कोसळलं; २ वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणा प्रतिनिधी - तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले आहे. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ८.५५ वाजता हा

खड्ड्याचा अंदाज न आल्याने ऑटो पडला खड्ड्यात .
दीपाली सय्यद यांची माजी स्वीय सहायकाविरोधात पोलिसात तक्रार
इंदोरीकर महाराजांची एकनाथ शिंदेंच्या बंडावर जोरदार बॅटिंग | LokNews24

तेलंगणा प्रतिनिधी – तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले आहे. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ८.५५ वाजता हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे. वायुसेनेने सांगितले की, आज सकाळी नियमित प्रशिक्षणादरम्यान PC 7 Mk II विमानाला अपघात झाला. त्यात दोन पायलट होते. दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, यामध्ये कोणत्याही नागरिकाची जीवितहानी झालेली नाही. एअरफोर्स अकादमीत प्रशिक्षणादरम्यान दिंडीगुलमध्ये हा अपघात झाला. मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील मेडक जिल्ह्यात हा अपघात झाला. विमानात भारतीय हवाई दलाचे दोन अधिकारी होते. हा अपघात झाला तेव्हा विमान तूप्रन भागात होते. एअरफोर्स अकादमी डुंडीगल येथून विमानाने उड्डाण केले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला. या दुर्घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दुःख व्यक्त केले आहे. “हैदराबादजवळ झालेल्या या अपघातामुळे दुःख झाले. यात दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागलाया दु:खद प्रसंगी मृत वैमानिकांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत, असे ते म्हणालेत

COMMENTS