Homeताज्या बातम्यादेश

ईडीच्या अधिकार्‍याला 20 लाखाची लाच घेतांना अटक

नवी दिल्ली ः देशभरात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकत अनेक राजकीय नेत्यांना धडकी भरवण्याचा काम केले असले तरी, तामिळनाडू पोलिसांनी ईडीच

Superfast Maharashtra : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर (Video)
महावितरणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
महात्मा फुलेंचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे

नवी दिल्ली ः देशभरात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकत अनेक राजकीय नेत्यांना धडकी भरवण्याचा काम केले असले तरी, तामिळनाडू पोलिसांनी ईडीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यालाच अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या अधिकार्‍याला 20 लाखाची लाच घेतांना अटक करण्यात आले आहे. अंकित तिवारी असे या अधिकार्‍याच नाव असून दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाच्या (डीव्हीएसी) मुदुराई शाखेने ही कारवाई केली आहे.

शुक्रवारी दिंडीगूल- मदुराई महामार्गावरून पोलिसांनी त्याला त्याब्यात घेतले. राज्य सरकारच्या संस्थेने केंद्र सरकारच्या अधिकार्‍याला अटक करण्यात आलेली महिना भरातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकार्‍याला अटक केली होती. अंकित तिवारीने यापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये सेवा बजावली आहे. दरम्यान शुक्रवारी दिंडीगुलमधील एका व्यक्तीकडून 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना तामिळनाडून पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ज्या व्यक्तीने तिवारीची पोलिसांकडे तक्रार केली त्याने 20 देण्याचे मान्य केल्यानंतर डीव्हीएसी च्या अधिकार्‍यांना माहिती दिली होती. त्यानंतर या अधिकार्‍याला पकडण्यात पोलिसांना सहकार्य केलं होतं. केंद्र सरकारची संस्था असलेली ईडी तामिळनाडूतील मंत्री आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍याची चौकशी करत होते. याच दरम्यान तामिळनाडूच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रलंबित असलेल्या एका प्रकरणात अंकित तिवारीने संबंधित व्यक्तीला आश्‍वासन दिले होते. त्याबदल्यात 20 लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली. दिल्ली आणि राजस्थानमध्ये हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये ईडीचे अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये अडकत असतात. त्या तुलनेत दक्षिण भारतात घडलेली ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS