Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकसित भारत संकल्प यात्रेत मा.प्रधानमंत्री यांचे उद्भोदन 

नाशिक मधील गंगावऱ्हे मधील ग्रामस्थांचा सहभाग

नाशिक : विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमांतर्गत दुरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक तालुक्यातील गंगाव-हे येथील ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी झाले होते

फडणवीसांसह अनेकांना अडकवण्याचा ’मविआ’ कट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिर्डी येथे भव्य छायाचित्र प्रदर्शनास सुरूवात
Ahmednagar Sex Racket Exposed : हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा (Video)

नाशिक : विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमांतर्गत दुरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक तालुक्यातील गंगाव-हे येथील ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमात देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्बोधित केले, गेल्या १५ दिवसात विकसित भारत संकल्प यात्रा ही देशभरात गावागावात सुरू आहे, देशातील १२ हजार ग्रामपंचायतीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा ही पोहचली आहे, या माध्यमातून सरकारच्या योजना या नागरिकांपर्यंत पोहचताय, असे प्रतिपादन देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती देणारे व संबंधित योजनेची नोंदणी करणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते, यामध्ये आयुष्मान भारत योजना, नरेगा जॉब कार्ड, प्रधान मंत्री पोषण अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व उपस्थित अधिकाऱ्यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे यांच्यासह ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS