Homeताज्या बातम्यादेश

विषारी सिरप पिल्याने पाच जणांचा मृत्यू

गुजरात राज्यातील खेडा येथील घटना

अहमदाबाद ः गुजरातमध्ये मिथाइल अल्कोहल युक्त विषारी सीरप पिल्याने पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण आजारी पडले आहेत. आजारी लोकांनी रुग्णालयात द

कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय
रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांसमवेतच्या आढावा बैठकीत रूसा अंतर्गत २६.५१ कोटी अनुदानाचे वाटप
सेक्स रॅकेट चालवणार्‍या कल्याणीस पोलिस कोठडी

अहमदाबाद ः गुजरातमध्ये मिथाइल अल्कोहल युक्त विषारी सीरप पिल्याने पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण आजारी पडले आहेत. आजारी लोकांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घटनेची चौकशी सुरू केली आहे. ही घटना गुजरातमधील खेडा येथे झाली. लोकांनी हे सीरप एका किराणा स्टोरमधून खेरदी केले होते. मृत व्यक्ती बगडु आणि बिलोदरा गावातील असल्याचे सांगितले जात आहे. मागील पाच दिवसात हे मृत्यू झाले आहेत. सिरप एका आयुर्वेदिक कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे.
गुजरातमधील खेड़ा जिल्ह्यात मिथाइल अल्कोहल युक्त विषारी आयुर्वेदिक सीरपच्या सेवनाने मागील दोन दिवसात कमीत कमी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. सिरप पिऊन आजारी पडलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, ’कालमेघसव-आसव अरिष्ट’ नावाच्या ब्रांडेड आयुर्वेदिक सिरप, खेडा जिल्ह्यातील नडियाद शहराजवळच्या बिलोदरा गावातील एका दुकानदारने जवळपास 50 लोकांना विकले गेले होते. खेडाचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी सांगितले की, एकाच्या रक्तातील नमुन्याचे रिपोर्ट आले आहेत. सिरप विक्री करण्यापूर्वी त्यामध्ये मिथाइल अल्कोहोल मिसळले गेले होते. मागील दोन दिवसात हे सीरप पिऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दुकानदारासह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिथाइल अल्कोहल एक विषारी पदार्थ आहे.

COMMENTS