Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात

मुंबई ः शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी अंतिम ठप्प्यात असून, याप्रकरणी गुरुवारी देखील सुनावणी घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल

पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक l DAINIK LOKMNTHAN
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही; पालकमंत्री छगन भुजबळ
आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण

मुंबई ः शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी अंतिम ठप्प्यात असून, याप्रकरणी गुरुवारी देखील सुनावणी घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या सुनावणीमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळत असून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांच्याकडून उलटतपासणी सुरू आहे.
यामध्ये सुनील प्रभूंना अनेक प्रश्‍न विचारत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न महेश जेठमलानींनीकडून करण्यात आला. आधीच्या सुनावणीत झालेल्या ई- मेलवरुनही महेश जेठमलानी यांनी उलट तपासणी केली. शिवसेनेमध्ये ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येतं का? असा प्रश्‍न महेश जेठमलानी यांनी विचारला. यावर सुनील प्रभूंनी सेनेच्या घटनेमध्ये जे आहे त्यानुसार नियुक्ती केली जाते, असे उत्तर दिले. तसेच शिवसेनेची घटना त्यांच्या विचारधारेशी विरूद्ध अशा पक्षाशी युती करण्याची मुभा देते का? असा प्रश्‍नही जेठमलानी यांनी विचारला. त्यावर सुनील प्रभू यांनी हो असे उत्तर दिले. यावेळी 2018 नंतर शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्याच नाहीत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची नियुक्ती वैध नसल्याचं शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी म्हणाले. दरम्यान, आजच्या सुनावणीत अनिल देसाई यांनी 4-4-2018 ला निवडणुक आयोगाला दिलेले हे पत्र बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. हे पत्र पक्षांतर्गत घटनेत सुधारणा करून पक्ष प्रमुख पद तयार करून त्यांना सर्व अधिकार दिल्याचे आणि इतर संघटनात्मक बदल केल्याचे आहे. हे पत्र निवडणुक आयोगाला दिल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. पण हे पत्र बनावट असून आजपर्यंतच्या कोणत्याच सुनावणीत सादर करण्यात आलेले नाही असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

COMMENTS