Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या प्रकरणात आरोपीला 21 वर्षांनी अटक

मुंबई / प्रतिनिधी : सन 2001 मध्ये कांदिवलीमध्ये झालेल्या डबल मर्डर प्रकरणात वॉन्टेड आरोपीला 22 वर्षांनी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. यशवं

देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा उत्साहात
बेकायदेशीर वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण अटकेत
शेतकरी मदतीवरुन विरोधक आक्रमक ; शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांनाही व्हीप जारी

मुंबई / प्रतिनिधी : सन 2001 मध्ये कांदिवलीमध्ये झालेल्या डबल मर्डर प्रकरणात वॉन्टेड आरोपीला 22 वर्षांनी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. यशवंत बाबुराव शिंदे असे आरोपीचे नाव असून या प्रकरणात इतर 3 सह आरोपींना पोलिसांनी 2001 मध्येच अटक केली होती. कुरार पोलीस ठाण्यात या दुहेरी खुनाच्या प्रकगणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी फिर्यादी तक्रारदार जहराबी अब्दुल रेहमान त्याचे पती व मुलीसोबत कांदिवलीच्या क्रांतीनगर परिसरातील हनुमान चाळीत वास्तव्यास होते. तक्रारदार महिलेच्या मुलीचे आरोपी यशवंत शिंदे याच्याशी प्रेम संबंध होते.

परंतू मुलीच्या घरातून नात्याला विरोध होता. 12 ऑगस्ट 2001 रोजी आपल्या घरी झोपलेले असताना आरोपी शिंदे याने त्याच्या साथीदारासह संगनमत करून पेट्रोल टाकून फिर्यादी व त्यांचे पती झोपेत असताना आग लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपीचे मुलीशी प्रेम संबंध असताना तीचा विवाह दुसर्‍या मुलाशी ठरविल्याच्या कारणावरून आरोपीने गुन्हा केल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत पती-पत्नी भगवती रुग्णालयात उपचार घेत असताना दोघांचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले.

गुन्ह्याच्या तपासात सहआरोपी मोहिद्दीन चांदपाशा शेख, नागनाथ मोहनराव तेलंगे, व्यंकट बाबुराव पाचावाड यांना अटक करण्यात आली होती. परंतू गुन्ह्यातील मुख्य आरोपीत यशवंत बाबुराव शिंदे हा पळून गेला होता. त्याचा गुन्हे शाखाचे पथक तपास करत होते. गुन्हे शाखेच्या कक्ष 12 च्या अधिकार्‍यांना माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा सद्या कोंडवा खूर्द, पुणे येथे स्वतःची ओळख लपवून व वेशांतर करून राहत असल्याचे समजले होते. तसेच त्याने या कालावधीत स्वतःचे लग्न केले. परंतू त्यावेळी त्याने कोणत्याही नातेवाईकांना लग्नासाठी बोलावले नव्हते. तसेच तो घटनेनंतर कधीही त्याचे लातूर येथील मुळ गावी गेला नव्हता, अशी माहिती प्राप्त झाली होती. माहिती मिळताच पोलीस पथकाने कोंडवा, खूर्द पुणे या परिसरात सलग 24 तास शोध घेवून आरोपीला ताब्यात घेतले.

COMMENTS