नवी दिल्ली / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये चूक केल्याप्रकरणी पंजाबमधील सात पोलिस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये चूक केल्याप्रकरणी पंजाबमधील सात पोलिस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या प्रचारासाठी 5 जानेवारी रोजी पंजाब दौर्यावर गेले होते. यावेळी शेतकर्यांच्या आंदोलनामुळे त्यांचा ताफा उड्डाण पूलावर 20 मिनिटांसाठी अडकून पडला होता. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील या निष्काळजीपणामुळे फिरोजपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि दोन डीएसपी दर्जाच्या अधिकार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या निष्काळजीपणासाठी भाजपने तत्कालीन चरणजिंत सिंग चन्नी सरकारला दोषी ठरवले होते. दुसरीकडे, काँग्रेसने म्हटले होते की, मोदींचा नियोजित मार्ग ऐनवेळी बदलण्यात आला होता.
मोदींचा ताफा ताडकळत ठेवल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने अनेक पोलीस अधिकार्यांना दोषी ठरवले आहे. भगवंत माने यांच्या नेतृत्वातील आप सरकारने याप्रकरणी सात पोलीस अधिकार्यांना निलंबित केले आहे. यात तेंव्हाचे फिरोझपूरचे पोलीस प्रमुख आणि आताचे एसपी गुरुबिंदर सिंग, डीएसपी दर्जाचे पोलीस अधिकारी परसन सिंग, जयदीश कुमार, इन्स्पेक्टर जतिंद्र सिंग आणि बलविंदर सिंग, सब इन्स्पेक्टर रमेश कुमार यांचा समावेश आहे. ऑर्डरमध्ये सांगण्यात आलेय की, सर्व सात पोलीस अधिकार्यांवर पंजाब सिव्हिल सर्व्हिसेस (पनिशमेंट आणि अपिल) नियम 8 नुसार कारवाई होईल. या नियमांतर्गत अधाकार्यांची सेवा समाप्ती करण्याची देखील तरतूद आहे. दरम्यान, मोदी यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याने मोठा गदारोळ झाला होता.
COMMENTS