Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिटको रुग्णालयात तंत्रकुशल मनुष्यबळ हवे ; माजी नगरसेवक जगदीश पवार यांची मागणी  

नाशिक प्रतिनिधी - नाशिकरोड-जेलरोड शहरासह पूर्व भागातील सुमारे ४० खेडयातील नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सुविधेचा सुलभ व सोईस्कर पर्याय म्हणून मन

आरोग्यदूत जगदीश पवार यांचेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार  
नाशिकचे आरोग्यदूत जगदीश पवार यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर  
माजी नगरसेवक जगदीश पवार यांच्या प्रयत्नांना यश

नाशिक प्रतिनिधी – नाशिकरोड-जेलरोड शहरासह पूर्व भागातील सुमारे ४० खेडयातील नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सुविधेचा सुलभ व सोईस्कर पर्याय म्हणून मनपा प्रशासनाच्या बिटको रुग्णालयाचा मोठा आधार आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासुन वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता न झाल्याने येथील रुग्णांना खासगी रुग्णालयाची पायरी चढत मोठया आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे.

बिटको रुग्णालयात रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता या ठिकाणी उत्तम व चालु स्थितीतील साधनांसह कुशल मनुष्यबळाची उपलब्धता असणे अनिवार्य बनले आहे. मात्र, अनेक दिवसांपासुन या रुग्णालयात रुग्णसंख्या व आरोग्य कर्मचारी यांचे प्रमाण व्यस्त असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. यातून अनेकदा रुग्णालय व्यवस्थापन व रुग्णाचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत.

पुढील काही दिवसांत कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची पदभरती मनपा प्रशासनामार्फत करण्यात येणार असल्याचे समजते. या भरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्ती देण्यात येणाऱ्या जास्तीत जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा बिटको रुग्णालयास उपलब्ध होतील, यादृष्टीने आपले स्तरावरुन नियोजन करण्यात यावे, अशी विनंती सदर निवेदनाद्वारे माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी केली आहे.

आपत्कालीन वॉर्डचे बळकटीकरण व्हावे, बिटको रुग्णालयातील रुग्णांची संख्यात्मक वाढ लक्षात घेता याठिकाणी आपत्कालीन परिस्थिती रुग्णांना बेडच्या अनुपलब्धतेला सामोरे जावे लागत आहे. बेडची संख्या मर्यादीत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय व्यवस्थापनाला मोठी कसरत यानिमीत्ताने करावी लागते. या प्रपंचात रुग्णाच्या जिवीतास मोठी हानी पोहचण्याची शक्यताही अधिक असते. ही बाब लक्षात घेता बिटको रुग्णालयातील तळ मजल्यावर उपयोगाविना पडून असलेल्या बेडला उपयोगात आणत आपत्कालीन कक्षाचे बळकटीकरण करणे शक्य होणार आहे

 काही दिवसांत कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या जास्तीत जास्त आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा बिटको रुग्णालयास आपले स्तरावरुन सत्वर आरंभण्यात यावी. सदर निवेदनातील व्यवहार्य मागण्यांचा सकारात्मक विचार प्रत्यक्ष कार्यवाहीतून प्रतित न झाल्यास नागरी आरोग्याबाबत मनपा प्रशासन गंभीर नसल्याचा निष्कर्ष काढला जावून मोठ्या नागरी प्रक्षोभाला मनपा प्रशासनाला सामोरे जावे लागेल. श्री. जगदीश शंकर पवार

COMMENTS