Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

जालना ः मराठा आरक्षणानंतर आता राज्यामध्ये धनगर समाजाला एसटीतून आरक्षण हवे आहे, त्यासाठी धनगर समाज देखील आक्रमक होतांना दिसून येत आहे. मंगळवारी आर

धनगर समाजाच्या उपोषणाची सरकारकडून दखल
सोलापुरात आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

जालना ः मराठा आरक्षणानंतर आता राज्यामध्ये धनगर समाजाला एसटीतून आरक्षण हवे आहे, त्यासाठी धनगर समाज देखील आक्रमक होतांना दिसून येत आहे. मंगळवारी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांकडून जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, पण मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी येण्यासाठी उशीर करीत आहेत या समजातून आंदोलक संतप्त झाले. या संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या तर वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ उडाली होती.
 अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चा असल्याने पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात होतेच. या पोलिसांकडून आक्रमक मोर्चेकरांना शांत करण्याचा आणि पांगवण्याचा प्रयत्न केला. तसेच दगडफेक झाल्याची माहिती मिळताच अधिकची पोलिस कुमक सुद्धा मागवण्यात आली. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. जिल्हाधिकार्‍यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार होते. मात्र, मोर्चेकरांची मागणी होती की, जिल्हाधिकार्‍यांनी खाली यावे आणि आपले निवेदन स्वीकारावे. चार ते पाच आंदोलकांना निवेदन देण्याची परवानगी देण्यात येते. मात्र, आंदोलकांची संख्या मोठी असल्याचं लक्षात घेता. पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले. यानंतर आक्रमक झालेल्या मोर्चेकरांनी गेटवर चढून आतमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर कार्यालयाच्या आवारात असलेल्या गाड्यांची तोडफोड तसेच इतर साहित्याची नासधूस सुरू केली. दोन महिन्यांपूर्वी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाला एसटी संवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते.या वेळी शासनाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन 50 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली तरी सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठीधनगर समाजाच्यावतीने जालन्यात विशाल मोर्चा काढण्यात आला. गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभाही घेण्यात आली. मात्र निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न दिल्याने मोर्चेकरांनी मोठा गोंधळ केला. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर बांधव सहभागी झाले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना अडवण्यात आले. ज्यामुळे संतप्त आंदोलकांनी गेटवरुन चढून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोर्चेकरांकडून परिसरातील दुचाकींसह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप परिस्थिती नियंत्रणात आणली. आक्रमक मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी पांगवल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट केलं नाही; तर सरकारला सत्तेवरून खाली खेचू असा इशाराही यावेळी देण्यात आला.

COMMENTS