Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. कुमार सप्तर्षी यांना जीवन गौरव पुरस्कार

बारामती येथे शरद पवार यांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडियाचा पुरस्कार

कर्जत : ज्येष्ठ विचारवंत तथा युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हॉईस

लोकशाही नव्हे, विरोधकांचे अस्तित्व धोक्यात ः पालकमंत्री विखे
कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारांचे आंदोलन
 रेल्वेचा धक्का बसून 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू 

कर्जत : ज्येष्ठ विचारवंत तथा युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर पत्रकार अधिवेशन बारामती येथे आयोजित केले होते. यावेळी जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडियाचा जीवन गौरव पुरस्कार डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, श्रीराम पवार, जयश्री खाडीलकर, प्रकाश पोहरे यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्व पुरस्कारार्थी तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, चंद्रमोहन पुपाला आदी या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमात संजय आवटे यांनी पुरस्कारार्थींची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी शरद पवार म्हणाले, बदलत्या परिस्थितीत देशातील माध्यमांचीही स्थिती बदलली आहे. पत्रकारांना स्वत:ची स्वतंत्र भूमिका घेण्यास फारसा वाव नाही, कोणाच्या सूचनेनुसार नव्हे तर योग्य आणि न्याय्य बाजू असेल तर जरुर मांडली पाहिजे, सामान्य माणसाचा आवाज बनण्याचे काम पत्रकारांनी करावे. अध्यक्षीय भाषणात सुशीलकुमार शिंदे म्हणाले, व्हॉईस ऑफ मिडीया ही संघटना छोट्या पत्रकारांसाठी काम करते आहे ही बाब कौतुकास्पद आहे. सामाजिक परिस्थिती नीट राहायला हवी, त्यात पत्रकारांचीही भूमिका महत्वाची आहे.

COMMENTS