Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यामध्ये मार्च 2023 मध्ये केमिकल युक्त बनावट दूध निर्मिती व विक्री प्रकरणी श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे अन्न व औषध प्र

तुमचे आजचे राशीचक्र मंगळवार, ८ जुन २०२१ l पहा LokNews24
ध्रुव ग्लोबलच्या जलतरणपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
नगरकरांनी पाठवले खड्ड्यांचे तब्बल अकराशेवर फोटो…

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यामध्ये मार्च 2023 मध्ये केमिकल युक्त बनावट दूध निर्मिती व विक्री प्रकरणी श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी आरोपी बाळासाो पाचपुते व इतर यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अन्न भेसळ कायदा प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात एकूण 30 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. सदर प्रकरण विधीमंडळ अधिवेशनात तारांकीत प्रश्‍न म्हणून देखील गाजले होते. सदर गुन्ह्यातील काही आरोपींनी सत्र न्यायालय श्रीगोंदा, उच्च न्यायालय औरंगाबाद तसेच सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे अटकपूर्व जामिनासाठी दाद मागितली होती. परंतू त्यांना न्यायालयांनी अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर आरोपी यांनी अ‍ॅड. संदीप कावरे यांचेमार्फत श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयात रेग्युलर जामीन मांडला होता. त्यास न्यायालयाने अ‍ॅड. संदिप कावरे यांच्या युक्तीवादावर आरोपींना जामिन मंजूर केला. सदर आरोपीचा जामीन हा चार्जशिट दाखल होण्यापूर्वीच झालेला आहे. अशा प्रकरणामध्ये मुख्य आरोपीस चार्जशीट येण्यापुर्वीच जामीन मंजूर झाला ही विशेष बाब आहे. सदर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. संदिप कावरे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. प्रतापसिंह तिखोळे व अ‍ॅड. निलेश शेलार व अ‍ॅड. अजय समिंदर यांनी सहकार्य केले.

COMMENTS