Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव तालुक्यामध्ये ऊस दरासाठी तीव्र आंदोलन

कारखाना प्रशासनासोबतची बैठक निष्कळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी आक्रमक

शेवगाव ः शेवगाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांकडून ऊस दराची घोषणा व्हावी. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी साखर सहसंचालक

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करा
शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश
आकारी पडीत शेतकर्‍यांचा लढा उभारणार्‍यांचे खरे योगदान ः धुमाळ

शेवगाव ः शेवगाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांकडून ऊस दराची घोषणा व्हावी. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी साखर सहसंचालक शेवगाव तहसीलदार व साखर कारखानदार यांना निवेदन दिले होते. परंतु अद्याप पर्यंत चालू हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न केल्यामुळे बुधवारी सकाळी शेवगाव – पैठण रोडवरील गंगामाई साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली.
     जोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही. तोपर्यंत कोणत्याही प्रकारे उसाची वाहतूक होवू दिली जाणार नाही. अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गंगामाई कारखान्यासह लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना, मुळा सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना, केदारेश्‍वर सहकारी साखर कारखाना, या कारखान्यांचे वाहने यावेळी अडवण्यात आली. जोपर्यंत 3100 रुपये भाव देण्यात येणार नाही. तोपर्यंत कुठलेही ऊस वाहतुकीची वाहने सोडण्यात येणार नाही. अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी गंगामाई कारखान्याचे प्रशासन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांमधील बैठक निष्फळ ठरल्याने पेच कायम राहिला. तालुक्यातील शेवगाव नेवासा रोड वरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भातकुडगाव फाटा व ज्ञानेश्‍वर कारखान्याच्या कार्यस्थळावरील वजन काट्यावर ऊस दरवाढीच्या संदर्भात जोरदार घोषणा बाजी करीत आंदोलन केले.या अंदोलनाला उस उत्पादक शेतकरी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी शेतकर्‍यांकडून साखर कारखानदार प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब फटांगडे, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, संदीप मोटकर, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गर्जे, औरंगाबादचे जिल्हा अध्यक्ष माऊली मुळे, रमेश कचरे, दादा पाचरणे, दादा टाकळकर, रामेश्‍वर शेळके, विकास साबळे, नाना कातकडे, रामेश्‍वर शेळके, शिवाजी साबळे, शेवगाव तालुका युवकचे अमोल देवढे, संकेत कचरे, नाना कातकडे, घोटण खानापूर, एरंडगाव, बाभूळगाव, क-हेटाकळी, गदेवाडी तसेच घोटण पंचक्रोशीतील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी गंगामाई कारखाना प्रशासनाशी चर्चा झाली यावेळी कारखाना प्रशासनाने 2700 रुपये दर जाहीर केला, तसेच इतर कारखान्यांनी दर वाढीव दिला. तर आम्हीही देऊ असा पवित्र घेतल्यामुळे या चर्चेत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आंदोलन चालूच राहील. सर्व साखर कारखाना हे पडद्यामागून एकच आहेत असे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांनी एकजूट होऊन कारखान्यांना ऊस देऊ नये अशी आव्हानही लवांडे यांनी केले. तसेच प्रशासनाने यावेळी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे शेवगाव- पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.ही चर्चा निष्फळ ठरली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले, दत्तात्रय फुंदे संतोष गायकवाड यांनी चर्चेत भाग घेतला होता.

COMMENTS