Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पाथर्डी ः समाजमाध्यमातून वंजारी समाजातील माहिलांबद्दल गलिच्छ भाषेत अपशब्द वापरणार्‍या सचिन लुगाडे याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्

कोपरगाव शहरात महिलेची आत्महत्या, तीन आरोपींवर गुन्हा
राजधानीत गाठला कू्ररतेचा कळस
पती – पत्नीची एकत्रित आत्महत्या | loknews24 (Video)

पाथर्डी ः समाजमाध्यमातून वंजारी समाजातील माहिलांबद्दल गलिच्छ भाषेत अपशब्द वापरणार्‍या सचिन लुगाडे याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सकल वंजारी समाजाच्या वतीने लुगाडे याला त्वरित अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे, अर्जून धायतडक, रणजित बेळगे, राष्ट्रीय वंजारी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र दगडखैर, अविनाश पालवे, विजय आव्हाड, सुनील पाखरे, दत्ता खेडकर,महादेव दहिफळे, भाऊसाहेब शिरसाठ, पोपट पालवे, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गर्जे, अँड. प्रतीक खेडकर, अ‍ॅड.विठ्ठल बडे, कुंडलिक दौंड, सुभाष खेडकर, अजिनाथ दहिफळे, सुनील दौंड, बाबासाहेब वाघ, निलेश वाघ आदी उपस्थित होते. अर्जुन पोपट धायतडक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 10 नोव्हेंबर रोजी फेसबुक या समाज माध्यमातुन सचिन लुगाडे (पुर्ण नांव गांव माहित नाही. )या नावाने असलेल्या फेसबुक खात्यावरुन वंजारी गर्ल बॉईज ऑफिशीयल या ग्रुपवर समाजाची व समाजातील महिलांची बदनामी होईल अशी पोस्ट केली असून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, गुप्तवार्ताचे भगवान सानप,अरविंद चव्हाण यांनी समाजबांधवांच्या भावना समजून घेत उद्धव ठाकरे शिवसेना, शिंदे गट शिवसेना, राष्ट्रीय वंजारी परिषद, जय भगवान महासंघ यांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले.

COMMENTS