Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिरो मोटोकॉर्पवर ईडीची कारवाई

पवन मुंजाळची 25 कोटींची मालमत्ता सील

मुंबई : हिरो मोटोकॉर्पचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष पवन मुंजाळ यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कारवाईचा बडगा उगारला आ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक
आठवडे बाजारातील दुकानदार व ग्राहकांना मोफत पाण्याची सोय ः काका कोयटे
टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा… धोनीचाही महत्वाचा ‘रोल’

मुंबई : हिरो मोटोकॉर्पचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष पवन मुंजाळ यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने मुंजाळ यांची 24.95 कोटींची संपत्ती सील केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर हिरो मोटोकॉपच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. ईडीनं या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी केले असून, यात म्हटले आहे की, सीमा शुल्क कायद्याच्या कलम 135 अंतर्गत डीआरआयने पीके मुंजाळ व अन्य काही जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. त्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुंजाळ यांनी 54 कोटी रुपयांचे परकीय चलन बेकायदेशीररित्या भारतातून बाहेर काढण्यात नेल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पवनकांत मुंजाळ यांनी इतर व्यक्तींच्या नावे विदेशी चलन पाठवले आणि नंतर परदेशात ते आपल्या वैयक्तिक खर्चासाठी वापरले, असे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अधिकृत डीलर्सकडून विविध कर्मचार्‍यांच्या नावे विदेशी चलन काढून घेतले आणि नंतर ते पवनकांत मुंजाळ यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला दिले. रिलेशनशिप मॅनेजरने पवनकांत मुंजाळ यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दौर्‍यांसाठी रोख स्वरूपात तसेच कार्डद्वारे हे परकीय चलन गुप्तपणे पाठवले. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत प्रति व्यक्ती 2.5 अमेरिकी डॉलरच्या मर्यादेतून पळवाट काढण्यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली होती. ईडीने याआधी 1 ऑगस्ट 2023 रोजी मुंजाळ आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती व संस्थांवर छापे टाकले होते. या छाप्यात डिजिटल पुराव्यांसह 25 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. जप्ती आणि जप्तीची एकूण किंमत अंदाजे 50 कोटी रुपये होती. या प्रकरणी ईडीची चौकशी अद्याप सुरू आहे. ईडीच्या आताच्या कारवाईचा हिरो मोटोकॉर्पच्या शेअरला मोठा फटका बसला आहे. कंपनीचे शेअर जवळपास 2 टक्क्यांनी घसरून 3110.65 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

COMMENTS