Homeताज्या बातम्याविदेश

रोबोटने घेतला कर्मचाऱ्याचा जीव

दक्षिण कोरिया- दक्षिण कोरियामध्ये रोबोटने माणसाची हत्या केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. रोबोट बॉक्स आणि माणूस यांच्यात फरक करू शकत नाह

पंतप्रधान मोदींचा आज जिल्हाधिकार्‍यांशी संवाद ; देशातील 56 जिल्ह्यांत नगरचाही समावेश
लातूर जिल्ह्यात मोतिबिंदुच्या 23506 शस्त्रक्रिया
राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे : उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन

दक्षिण कोरिया- दक्षिण कोरियामध्ये रोबोटने माणसाची हत्या केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. रोबोट बॉक्स आणि माणूस यांच्यात फरक करू शकत नाही यामुळे ही घटना घडली आहे. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या माहितीनुसार, रोबोटिक आर्ममध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. रोबोटिक आर्म म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी हातासारखे उपकरण असते. या रोबोटिक आर्मकडे डबे उचलून पॅनेलवर ठेवण्याचे काम होते. पण या रोबोटिक आर्मने माणसाला बॉक्ससारखं पकडलं.रोबोटचे काम करतानाचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. रोबोटिक आर्म वस्तू उचलून ऑटोमॅटिक पॅनेलवर ठेवतात आणि वस्तू पुढे सरकतात. रोबोटिक आर्मच्या याच फंक्शनमुळे रोबोटिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला योनहॅप न्यूजच्या माहितीनुसार, कर्मचारी रोबोटचे काम तपासत असताना हा अपघात झाला. रोबोटिक आर्मने कर्मचाऱ्याला बॉक्सला जसं पकडतात तसे पकडले आणि ऑटोमॅटिक पॅनेलच्या दिशेने ढकलले. यामुळे कर्मचाऱ्याच्या चेहऱ्याला व छातीला गंभीर इजा झाली. गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

COMMENTS