Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट उत्साहात

बेलापूर ः येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट  संपन्न झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य

बेलापूर महाविद्यालयातील मीनल शेलार, श्रुती सराफ यांना सुवर्णपदक
बेलापूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन
बेलापूर महाविद्यालयाला नॅककडून बी प्लस

बेलापूर ः येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट  संपन्न झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी दिली आहे. क्यू गेट फायनान्स टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लिमिटेड या कंपनीच्या इंटरव्यू पॅनलच्या वतीने उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात बिझनेस हेड रुनित पठारे, व्यवस्थापक ऋषिकेश जर्‍हाड, युनिट प्रमुख अफरोज सय्यद उपस्थित राहिले.
बेलापूर महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेत पदवी घेत असलेल्या आजी व पदवी पूर्ण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेतला आहे. एकूण 46 इतके उमेदवारांनीया कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोंदणी केली. इनट्रॉडॉक्टरी सेशनचे अध्यक्षपद महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी भुषविले तर संस्थेचे विश्‍वस्त चंद्रशेखर डावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेशन संपन्न झाले. उमेद्वारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून 29 पात्र उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे असे डॉ. कोकाटे यांनी सांगितले आहे. या कॅम्पस इंटरव्यूमधून विद्यार्थ्यांचे मुलाखतीचे कौशल्य विकसित होण्यास नक्कीच मदत झाली आहे. पात्र उमेद्वारांची यादी सूचना फलकावर जाहिर केली आहे. या प्लेसमेंट कॅम्पसचा बेलापूर महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी लाभ घेतला असे प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.अशोक माने व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. प्रकाश देशपांडे यांनी सांगितले आहे. सदर कॅम्पसचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक ऋषिकेश जर्‍हाड, बिझनेस हेड रुनित पठारे, अफरोज सय्यद, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, प्लेसमेंटचे समन्वयक डॉ. अशोक माने, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा प्रकाश देशपांडे, प्रा.ओंकार मुळे, कार्यालयीन अधीक्षक संदेश शाहिर, संदीप चौधरी तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कंपनीचे ओनर सुहास साळवे, एच.आर अभिजीत ठाकूर, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अ‍ॅड शरद सोमाणी, नंदूशेठ खटोड, बापुसाहेब पुजारी, श्रीवल्लभ राठी, सहसचिव दीपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, भरत साळुंके, रविंद्र खटोड, अ‍ॅड. विजय साळुंके, चंद्रशेखर डावरे, प्रेमा मुथ्था, नारायणदास सिकची, शिक्षक प्रतिनिधी नामदेवराव मोरगे, प्राचार्य प्रो. डॉ. गुंफा कोकाटे, सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी ग्रामस्थ आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS