Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणी शिपाई अटकेत

मुंबई ः वांद्रे येथील एका शाळेतील शिपायाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी वांद्रे पोलिसांकड

भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू
बेलापुरात एक पणती जवानासाठी उपक्रम उत्साहात
कोयते, चाकू घेऊन दहशत करणारे सराईत गुन्हेगारांना अटक

मुंबई ः वांद्रे येथील एका शाळेतील शिपायाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी 33 वर्षीय शिपायाला अटक करण्यात आली.
वांद्रे परिसरातील एका शाळेमध्ये हा प्रकार घडला. तक्रारीनुसार 2 ते 7 नोव्हेंबर या काळात आरोपीने पाच मुलींना पहिल्या सहामाही परीक्षेचे पेपर देताना आक्षेपार्ह संभाषण केले. तसेच त्याने मोबाइलद्वारे दूरध्वनी करून, तसेच इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे या मुलींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच संभाषण करताना दुहेरी अर्थांच्या शब्दांचा वापर करून तो बोलत होता. याप्रकरणी वांद्रे पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तात्काळ विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित मुली 15 ते 17 वर्षे वयोगटातील आहेत. आरोपीच्या गैरवर्तनाचे सीसी टीव्ही कॅमेर्‍यातील चित्रीकरणही पोलिसांना प्राप्त झाले असून त्याच्या आधारावर मंगळवारी पोलिसांनी घटनास्थळावरून 33 वर्षीय आरोपीला अटक केली. अटक आरोपी भाईंदर येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसून आरोपीने अशा प्रकारे इतर मुलींचीही छेडछाड केली आहे का ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पीडित मुलींनी याबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS