नवी दिल्ली : पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता येत्या काही दिवसांत घरगुती एलपीजी सिलि
नवी दिल्ली : पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता येत्या काही दिवसांत घरगुती एलपीजी सिलिंडरवर आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहेत. एवढेच नाहीतर सामान्य ग्राहकांसाठीही सिलेंडरच्या किंमतीत कपात होऊ शकतात. सध्या या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडरवर ३०० रुपये सबसिडी दिली जात आहे. तर उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त सवलतीबाबत येत्या काही महिन्यांत निर्णय घेतला जाऊ शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा मास्टर स्ट्रोक ठरेल असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
COMMENTS