मुंबई : राज्यात 2 हजार 359 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले असून, त्याची मतमोजणी सोमवारी करण्यात आली. या निकालामध्ये महायुतीला कौल मिळाला
मुंबई : राज्यात 2 हजार 359 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले असून, त्याची मतमोजणी सोमवारी करण्यात आली. या निकालामध्ये महायुतीला कौल मिळाला असून, भाजप पक्ष अव्वल ठरला असून, अजित पवार गटाने मोठ्या प्रमाणावर जागा मिळवत मुसंडी मारली आहे. 2 हजार 359 ग्रामपंचायतीपैकी 278 जागा मिळवत राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष ठरला असून, दुसर्या क्रमांकावर अजित पवार गट असून, या गटाला 201 जागा मिळवत दुसर्या क्रमाकांवर बाजी मारली असून, शिंदे गटाने 130 जागा मिळवल्या आहेत. तर ठाकरे गटाने 57, काँग्रेस 7, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 66 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे.
भाजप नंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाने वर्चस्व मिळवले आहे. यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारली आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गट, तर पाचव्या क्रमांकावर ठाकरे गट आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या विजयाची आकडेवारी जारी केली आहे. पुण्यात बारामती आणि मावळ तालुक्यात अजित पवार यांच्या गटाने बाजी मारली आहे. काल काटेवाडी येथे अजित पवार गटावर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, बारामती तालुक्यातील 15 तर मावळ तालुक्यातील काही ग्रामपंच्यायतीवर अजित पवार गटाने वर्चस्व मिळवले आहे. बारामती तालुक्यात भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ , आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंज, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी गावात अजित गटाने बाजी मारली आहे. मावळ तालुक्यातील डोने गावात भाजपने तर दिवड गावात अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. डोने येथे भाजपचे हृषीकेश खारेक सरपंच झाले आहे तर दिवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश राजीवडे सरपंच झाले. पुण्यानंतर सोलापूर येथे भाजपने अनेक ग्रामपंचयातीवर सत्ता काबिज केली आहे. दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली. येथील यशपाल वाडकर हे सरपंच म्हणून निवडणून आहे आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतीत भाजपने वर्चस्व मिळवले आहे. येथे भाजपच्या सुजाता सुरेश पाटील या सरपंच झाल्या आहेत. तर कामठी तालुक्यातील कवठामध्ये देखील भाजपने बाजी मारली असून सरपंचपदी निलेश डफ्रे विजयी झाले आहे. वारेगाव येथे काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या रत्नबाई उईके या सरपंच म्हणून विजयी झाल्या आहेत. मिरज हरिपूर ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज हरिपूर ग्रामपंचायतीवर भाजपने बाजी मारली आहे.
राज्यातील निकाल –
एकूण संख्या- 2359
भाजपा- 278
शिवसेना (शिंदे) 130
राष्ट्रवादी (अजित पवार) 201
ठाकरे गट – 57
काँग्रेस- 71
शरद पवार गट- 66
COMMENTS