Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतात प्रथमच लॅसेर्टस सिंड्रोमचे निदान व युएसजी प्रणालीने हात शस्त्रक्रिया देशात प्रथमच सुरू 

 नाशिक प्रतिनिधी - सध्याच्या काळात अनेक प्रकारच्या अपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हाता -पायाचे फ्रॅक्चर होण्याच्या घटना देख

ज्ञानेश्वर म्हात्रे हे भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका ; सर्वोच्च न्यायालयाचा संताप;दिल्लीचा ऑक्सिजन कमी करू नका
भयंकर ! ३ सख्ख्या बहिणींसह २ चिमुकल्यांची निर्घृण हत्या I LOKNews24

 नाशिक प्रतिनिधी – सध्याच्या काळात अनेक प्रकारच्या अपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हाता -पायाचे फ्रॅक्चर होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे अन्यकारणाने शरीरातील अंगठे, बोटे, मनगट, कोपरा यांना दुखापत होणे, अर्धांग वायू, मज्जातंतू दुखापत यासारखे आजार होणे, यावर इलाज करणे आवश्यक असते. इतकेच नव्हे तर तुटलेले हात, संपूर्ण तुटलेली बोटे, तुकडा पडलेला पाय जोडण्याची यशस्वी सर्जरी करण्यात येते. 

     नाशिक मधील प्रसिद्ध हॅड सर्जन डॉ. गौरव पगारे यांच्या गंगापूर रोडवरील गौरव हॉस्पिटल व पंचवटीतील द हॅन्ड क्लिनिक मध्ये खात्रीशीर इलाज तथा उपचार करण्यात येतात. त्यामुळे रुग्णांच्या या दोन्ही रुग्णालयांमध्ये मोठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. कारण हाताची शस्त्रक्रिया ही नवीन अ‍ॅडव्हान्स सुपरस्पेशालिटी शाखा असून हाताच्या मनगटाच्या आणि वरच्या अंगाच्या विविध समस्या हाताळताना अत्याधुनिक पाश्चात वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

      डॉ. गौरव पगारे हे यांनी फ्रान्स देशातील पॅरीसच्या इंटरनॅशनल रिस्ट सेंन्टर कडून अलीकडेच प्रशिक्षण घेतलेले देशातील मोजके हँड सर्जन आहेत, विशेष म्हणजे त्यांनी भारतात प्रथमच  युएसजी (सोनोग्राफी) मार्गदर्शित प्रणालीने हात शस्त्रक्रिया देखील भारतात प्रथमच सुरू केल्या आहेत. ह्या पध्दतीची शस्त्रक्रिया कार्पल टनल सिंड्रोम, ट्रिगर फिंगर, अल्नार नर्व्ह एंट्रॅपमेंट, लॅसेर्टस सिंड्रोम आणि यासारख्या विविध आजारंवर उपचार करण्याचे कौशल्य डॉ.पगारे यांनी आत्मसात केले आहे.

COMMENTS