Homeताज्या बातम्यादेश

पंचमहालमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

गुजरात प्रतिनिधी - गुजरातमध्ये जवानांना घेऊन जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. पंचमहल जिल्ह्यात झालेल्या या अपघातात राज्य राखीव पोलीस  दला

जुन्नरजवळील अपघातात दोन महिलांचा मृत्यू
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात
केरळमध्ये भरधाव स्कूल बसची रिक्षाला धडक, चार महिलांसह 5 जणांचा मृत्यू

गुजरात प्रतिनिधी – गुजरातमध्ये जवानांना घेऊन जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. पंचमहल जिल्ह्यात झालेल्या या अपघातात राज्य राखीव पोलीस  दलाचे ३८ जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली. या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. पोलिसांनी सांगितले की, एसआरपी जवानांना घेऊन जात असलेली बस पंचमहल जिल्ह्यात उलटली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. सर्व ३८ जवान जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे .पोलिस निरीक्षक आर ए जडेजा यांनी सांगितलं की, दुर्घटनेवेळी बसमध्ये ५० जवान होते. त्यापैकी ३८ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं आहे. २९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर ९ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

COMMENTS