Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौरी शुगर कारखाना जिल्ह्यातील उच्चांकी भाव देणार : बोत्रे पाटील

श्रीगोंदा - दहा हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असलेला गौरी शुगर अँड डिसलरीज अलाईज प्रा. लिमिटेड कारखाना पूर्ण क्षमतेने या हंगामात चालवण्यासाठी ऊस उत

BREAKING: जिल्हा प्रशासनाकडून 24×7 कंट्रोल रूम कार्यान्वित ;LokNews24
बाराशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘विक्रम’ लँडरचे चित्र रेखाटून शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन
पाणीवीर’ व नवनिर्वाचित अधिकार्‍यांचा सत्कार सोहळा

श्रीगोंदा – दहा हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असलेला गौरी शुगर अँड डिसलरीज अलाईज प्रा. लिमिटेड कारखाना पूर्ण क्षमतेने या हंगामात चालवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार यांनी विश्‍वास दाखवावा सर्वाच्या सहकार्य मिळाल्यास कारखाना या हंगामात उच्चांकी भाव देऊन ऊस उत्पादकाना किमान वीस किलो पासून पुढे जेवढा गाळपाला ऊस येईल त्या प्रमाणात साखर देऊन सर्वांचा हंगाम गोड करणार असल्याची माहिती ओंकार ग्रुप चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमप्रसंगी दिली.
हिरडगाव येथील साईकृपा इंटिग्रेटेड साखर कारखाना हस्तांतरण ओंकार ग्रुप उद्योग समूहाकडे झाले. त्यानंतर गौरी शुगर अँड शुगर अलाईज लिमिटेड कारखान्याचा पाहिला गळीत हंगामाच्या सुरूवात बॉयलर प्रदीपन कार्यक्रम दादासाहेब बोत्रे पाटील, निर्मलाताई बोत्रे, राजेंद्र बोत्रे पा., ज्योतीताई बोत्रे पा पा., लिलाबाई बोत्रे पाटील आदींच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना गौरी ग्रुप चे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी शेतकरी, कामगार वाहतूकदार याच्या सर्वांच्या हितासाठी कारखाना काम करणार असून ऊस गाळपाला देणार्‍या शेतकर्‍यांना दर वर्षी वीस किलो पासून पुढे जेवढा ऊस येईल त्या प्रमाणात साखर देणार असल्याची माहिती दिली. सर्वांची साथ मिळाली तर जिल्ह्यातील उच्चांकी भाव देणार असल्याची घोषणा बोत्रे पाटील यांनी केली. इथेनॉल निर्मिती, उच्च दर्जाची साखर यासह अन्य उत्पादन करण्यात येणार असून कामगारानी केवळ आठ तास काम असणार आहे. त्याशिवाय दुसरे कोणतेही काम कामगारांकडून घेतले जाणार नाही. आपली कुणाबरोबर स्पर्धा नाही आमची आमच्याच बरोबर स्पर्धा असणार आहे. असे प्रतिपादन बाबुराव बोत्रे पाटिल यांनी केले. यावेळी गौरी शूगरच्या चेअरमन गौरीताई बोत्रे पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे पा., जनरल मॅनेजर रोहिदास यादव यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार सर्व खाते प्रमुख, कामगार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS