Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नोव्हेंबरपासून मेट्रो 3 च्या चाचण्या

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनन

अण्णांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन क्रांतीविरानां केले अभिवादन
शिवसेना उपजिल्हा प्रमुखावर गोळीबार ! | LokNews24
लोकायुक्त कायदा चर्चेविनाच मंजूर

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याची ट्रायल रन अर्थात चाचण्या नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. एमएमआरसीकडून मुंबईतील पहिल्या 33.5 किमीच्या भूमिगत मार्गाची उभारणी केली जात आहे. दोन टप्प्यात या मार्गिकेचे काम करण्यात येत असून सध्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. ही मार्गिका डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे. त्यामुळेच आता एमएमआरसीने हा पहिला टप्पा सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्यांना सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरपासून मेट्रो 3 मधील चाचण्यांना सुरुवात होणार असल्याच्या वृत्ताला एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी लोकसत्ताशी बोलताना दुजोरा दिला. मात्र नोव्हेंबरमध्ये कोणत्या दिवसापासून सुरुवात होणार हे सांगण्यास मात्र नकार दिला आहे. त्याचवेळी चाचण्या पूर्ण करून मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेत प्रत्यक्ष मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करणे यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सुरु होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

COMMENTS