Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड

मुंबई ः सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणार्‍या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात

शासन निर्णयानुसार शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे 
कोपरगावमध्ये दोन वर्षानंतर फुलणार ‘गोदाकाठ महोत्सव’
समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज नाव द्या

मुंबई ः सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणार्‍या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात सदावर्ते यांच्या गाडीची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून यात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील फुलंब्री गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. सदावर्तेंच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणार्‍या घराबाहेर आज सकाळी त्यांची गाडी उभी होती. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर तोडफोड करणारे फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते म्हणाले, मला वारंवार धमक्या येत आहेत तसेच जीवे मारण्याची धकमी दिली जात आहे. वकील गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले होते. यामुळे तेव्हापासूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष आहे. याचेच पडसाद हे आज उमटले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घराबाहेर उपोषण देखील केले होते. त्यानंतर आज ही घटना घडली.

हल्ल्याचे समर्थन नाहीच ः मनोज जरांगे – गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला नेमका कुणी केला माहीत नाही. आमचे आंदोलक असं काही करणार नाही, असं सांगतानाच अशा प्रकारच्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. सरकारने मराठा समाजाची मागणी गांभीर्याने घेऊन आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावावा, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. हल्ल्याबाबत मला काहीच माहीत नाही. कोण आहेत? काय आहेत? माहीत नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करतोय. हजारो गावात आंदोलन करतोय. आताही करत आहे. आमचं आंदोलन चालूच राहणार आहे, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS