Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दसरा दिवाळीमुळे प्रदूषण वाढण्याची भीती

मुंबई ः राज्यात ऐन ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ झाली असतांनाच, मुंबईमध्ये प्रदूषणात देखील वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्यामु

पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पाणबुडी मोटार चोरी करणारे जेरबंद
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाला फिल्म फेअर २०२३ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

मुंबई ः राज्यात ऐन ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ झाली असतांनाच, मुंबईमध्ये प्रदूषणात देखील वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्यामुळे मुंबईकरांसमोर आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतांना दिसून येत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता ’मध्यम खराब’ श्रेणीत पोहचली असून त्यामुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असतांना, आता ऐन दसरा आणि दिवाळीमध्ये प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 मुंबईतील हवेची गुणवत्ता तब्बल 127 एक्यूआय इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर आता सतत वाढत असलेल्या वायु प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार तसेच बीएमसीकडून उपाययोजना करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईतील प्रदूषणाची गंभीर दखल घेत प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जारी केल्या आहे. हवामान संस्था सफरने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या बोरिवलीतील हवेची गुणवत्ता 101 एक्यूआय, मालाडमध्ये 125 एक्यूआय, नवी मुंबईत 152 एक्यूआय, माझगावमध्ये 121 एक्यूआय आणि कुलाब्यातील हवेची गुणवत्ता 142 एक्यूआयवर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. रविवारी मुंबईतील एक्यूआय हा 127 वर पोहचला होता. मॉर्निंग वॉकला किंवा फिरण्यासाठी जाणार्‍या लोकांना दाट धुकं आणि खराब हवेचा सामना करावा लागला. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता ही मध्यम श्रेणीत असून त्याला कमी करण्यासाठी उपययोजना करण्यात येत आहे. 

COMMENTS