Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या शनिवारी

मुंबई ः या वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. येणार्‍या शरद पौर्णिमेला म्हणजेच 28 ऑक्टोबर 2023 रोजी हे चंद्र ग्रह

आठशे रूपयांसाठी तिसर्‍या मजल्यावरून फेकले खाली
ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली
जमिनीसाठी सावत्र भावाकडून भावाचीच हत्या

मुंबई ः या वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. येणार्‍या शरद पौर्णिमेला म्हणजेच 28 ऑक्टोबर 2023 रोजी हे चंद्र ग्रहण होणार आहे. हे ग्रहण आंशिक चंद्रग्रहण राहणार आहे. या वर्षी एकूण दोन चंद्रग्रहण झाले, पहिले चंद्रग्रहण 05 मे रोजी तर या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण हे 28 तारखेला होणार आहे. वर्षातील शेवटचे असणारे हे चंद्रग्रहण भारतात देखील पाहता येणार आहे.
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार आहे. या सोबतच हे चंद्रग्रहण अटलांटिक महासागर, हिंद महासागर, पश्‍चिम आणि दक्षिण प्रशांत महासागर, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्वेकडील भागात देखील दिसणार आहे. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागातील नागरिकांना देखील हे ग्रहण पाहता येणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कोणत्या राशीत आणि नक्षत्रात होईल? वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मेष आणि अश्‍विन नक्षत्रात होणार आहे. या ग्रहणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण किती वाजता सुरू होईल आणि समाप्त होईल? भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण हे 28 ऑक्टोबर रोजी रात्री 11.32 वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण 02.22 वाजता समाप्त होणार आहे.

COMMENTS