Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात दारु महागणार

मुंबई प्रतिनिधी - मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीये. महाराष्ट्रातील बार, लाउंज आणि कॅफेमध्ये दिलं जाणारं मद्य महागणार आहे. त्यामुळ

जालन्यात बँक व्यवस्थापकाला मारहाण
आयफोन खरेदीच्या नावाने 5 लाखाचा गंडा
40 दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल”: भाजपा | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24

मुंबई प्रतिनिधी – मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीये. महाराष्ट्रातील बार, लाउंज आणि कॅफेमध्ये दिलं जाणारं मद्य महागणार आहे. त्यामुळे येथे बसून मद्य पिणाऱ्या व्यक्तींना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. १ नोव्हेंबरपासून राज्यात दारू महागणार असून राज्य सरकारने VAT मध्ये ५ टक्क्यांनी वाढ केलीये. राज्य सरकारने परमिट रुम सर्व्हिसवर १ नोव्हेंबरपासून ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या आधी ५ टक्के व्हॅट आकारला जात होता. त्यात आणखी ५ टक्के वाढ केल्याने परमिट रुमवर एकूण १० टक्के व्हॅट दर आकारला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारनं परवाना शुल्कातील दरांत वाढ केली. त्यामुळे मद्यावरील दरही वाढला. अशात आता पुन्हा एकदा बार, लाउंज आणि कॅफेमधील दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

COMMENTS