Homeताज्या बातम्यामनोरंजन

मंदिरात चप्पल घातल्याने राणी मुखर्जी ट्रोल

मुंबई प्रतिनिधी - सध्या देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहेत. अशातच मुंबईतील जुहू ये

आतिशी यांची तब्येत खालावली
निर्यात बंद असल्याने फळांचा राजा मिळेल स्वस्तात
काही लोकांना काहीही न करता उद्घाटनाची हौस : आ जयंत पाटील

मुंबई प्रतिनिधी – सध्या देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहेत. अशातच मुंबईतील जुहू येथील एका सार्वजनिक दुर्गा पूजेत सेलेब्रिटी सहभागी झाले आहेत. नुकतेच अभिनेत्री राणी मुखर्जी हिने येथील मंदिरात देवीचे दर्शन घेतले आहे. मात्र तिच्या एका कृतीमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. राणी मुखर्जीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राणीसह काजोलचेही दुर्गा पूजेदरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील एका व्हिडिओमध्ये राणीने देवीच्या मंडपात चप्पल घातल्याचे दिसून आले. यावरूनच तिला सोशल मीडियावर नेटकरऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच चप्पल घालून ती देवीच्या जवळ जाऊन फोटो काढताना देखील दिसली.’चप्पल काढली असती उंची कमी झाली मॅडमची’, ‘तिने चप्पल घातली आहे, ‘चप्पल तरी काढायची, देवीपेक्षा महान नाही’, ‘देवीची भक्त असल्याचा दिखावा करत आहे,’ अशा कमेंट राणी मुखर्जीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. राणी मुखर्जीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, काही महिन्यांपूर्वी तिचा ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नार्वे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.दरम्यान, दुर्गा पूजा पंडालमध्ये काजोल स्टेजवर होती आणि तिचे सर्व लक्ष तिच्या फोनवर होते. त्यानंतर स्टेजच्या कडेला पोहोचताच ती अचानक खाली कोसळली. फोनमध्ये लक्ष असल्यामुळे तिच्या हे देखील लक्षात आले नाही की, आपण स्टेजच्या कडेला पोहचलो आहोत. मात्र, काजोल अडखळताच खाली उभ्या असलेल्या लोकांनी तिला पकडले आणि तिला पूर्णपणे पडण्यापासून वाचवले. या घटनेमुळे काजोलच्या पायाला दुखापत झाली आहे. यादरम्यान तिचा फोनही खाली पडला. यानंतर तिचा मुलगा युगही आईची काळजी घेताना दिसत होता.

COMMENTS