Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात

कोपरगाव ः भारतातील विविध पोलिस दलांमध्ये कर्तव्य बजावत असतांना देशासाठी हौतात्म पत्करलेल्या सर्व  पोलीस बांधव प्राणची आहुती देत शहीद होतात, त्या

2022 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार -शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील
वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार मतदारसंघातील जनतेला समर्पीत LokNews24
भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन

कोपरगाव ः भारतातील विविध पोलिस दलांमध्ये कर्तव्य बजावत असतांना देशासाठी हौतात्म पत्करलेल्या सर्व  पोलीस बांधव प्राणची आहुती देत शहीद होतात, त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी व पोलिसा प्रती आदर म्हणून  21 आक्टोंबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिनाच्या निमित्ताने आज विद्यालयात चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मार्गदर्शन करताना कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी पोलीसांची समाजा प्रति भुमिका समजावुन सांगितली. कर्तव्ये बजावतांना काही पोलिस शहीद होतात त्यांच्या प्रति आठवण म्हणून आजचा हा दिवस महत्वाचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. शहीद पोलीसांचा सन्मान करणे हे देखील आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.तर आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले.चित्रकला स्पर्धेचे संयोजन अनिल अमृतकर व अतुल कोताडे यांनी केले. विदयालयांच्या पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते, शहर पोलिस कॉन्स्टेबल राम खारतोडे आदीसह शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

COMMENTS