Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाकूचा धाक दाखवून सुमारे 50 हजाराचे सोन्याचे दागिने लुटले

अहमदनगर : रात्रीच्या वेळी कुटुंबीय घरात झोपलेले असताना अनोळखी ४ चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देवून महिलेच्या अंगावर

श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना घरातूनच अभिवादन करा- हिरे
परप्रांतियाकडं मिळाले पिस्तुलासह पाच काडतुसे | DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर : रात्रीच्या वेळी कुटुंबीय घरात झोपलेले असताना अनोळखी ४ चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देवून महिलेच्या अंगावरील दागिने तसेच घरातील रोख रक्कम असा सुमारे 50 हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना नगर तालुक्यातील पोखर्डी गावात मंगळवारी (दि. १७) पहाटे घडली आहे.

याबाबत शीतल शंकर दुसुंगे (रा.पोखर्डी, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शितल दुसुंगे व त्यांचे कुटुंबीय रात्री घरात झोपलेले असताना मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अनोळखी चार चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत शितल दुसुंगे यांच्या मुलाला, जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शितल यांना सर्व दागिने व रोकड काढून देण्यासाठी धमकावले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले, कानातील कर्णफुले, कुडके, तसेच कपाटातील ५०० रुपये व दागिन्यांच्या पावत्या असा ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेला.

चोरटे पसार झाल्यावर फिर्यादी दुसुंगे यांनी शेजारील नागरिकांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सकाळी पोलिस उपअधीक्षक संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर सहायक पोलिस निरीक्षक वाव्हळ आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

या प्रकरणी शितल  दुसुंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चार चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS