Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंत रांधवण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सुपा ः पारनेर तालुक्यातील टाकळीढोकश्‍वर येथिल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष पत्रकार वसंत रांधवण यांना. स्वराज्य

वसंत रांधवण यांना निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर
वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
वसंत रांधवण राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत

सुपा ः पारनेर तालुक्यातील टाकळीढोकश्‍वर येथिल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष पत्रकार वसंत रांधवण यांना. स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ऐ पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव  2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार रविवारी पुण्यातील जोशी सभागृह येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, विद्यानंदजी मानकर, युवक नेते प्रमोद दिवेकर, फिरोज मुल्ला (राष्ट्रीय अध्यक्ष), संतोष आठवले, चंद्रकांत मुळे, गौसिय खान विनित सागर गोलांडे, दत्तात्रय शिंदे, विठ्ठल गायकवाड,अशिफ भाई खान,यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत रांधवण यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्था तसेच अनुभवी व्यक्ती यांना यावर्षीचा राष्ट्रीय गौरव  2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संघटनेत स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटाऊन आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार निलेश लंके, टाकळीढोकश्‍वर ग्रामपंचायतचे सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, डॉ भाऊसाहेब खिलारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील,ग्रामस्थांनी तसेच निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, पत्रकार विनोद गोरे, प्राजक्ता व अक्षराज मीडिया आदींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी विषयी अभिनंदन केले आहे.

COMMENTS