Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातून 134 किलो गांजा मुंबई, नागपूर आणि वारणसीतून 31 किलो सोने जप्त

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्जमाफियांचे प्रमाण वाढत असून, नाशिक, पुणे आणि मुंबईमध्ये सातत्याने अमलपदार्थांची तस्करी होत असल्याचे

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुणे पॅटर्न उपयुक्त
एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा जणांचा मृत्यू
शिवरायांचा लोककल्याणकारी आदर्श राज्यकारभार आम्हां सर्वांना प्रेरणा देतो – छगन भुजबळ

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्जमाफियांचे प्रमाण वाढत असून, नाशिक, पुणे आणि मुंबईमध्ये सातत्याने अमलपदार्थांची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. ललित पाटील प्रकरण चर्चेत असतांना दौंडमधून मोठ्या प्रमाणात पोलिसांनी गांजा जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरुन तब्बल 90 किलो गांजा तर, दौंडमध्ये रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत 44 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डीआरआयच्या कारवाईत मुंबई, नागपूर आणि वाराणसी वरून 31.7 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईतून पाच जणांना, नागपूरवरून चौघांना तर वाराणसी वरून दोघांना करण्यात अटक करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 19 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. दौंड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत 44 किलो गांजा केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी गाडी क्रमांक 11020 भुवनेश्‍वर मुंबई कोणार्क एक्सप्रेस या गाडीमध्ये बेवारस बॅग आहे, अशी माहिती कंट्रोल रूममधून रेल्वे पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातही (र्झीपश) कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. ओडीसावरून पुण्याकडे येणार्‍या कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पुणे स्टेशनवर सापळा रचत कस्टम विभागाकडून दोन गांजा तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून 27 लाख रुपयांचा 90 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

COMMENTS