Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करीअर कडे बघतांना फॅमिली प्लॅनिंगला दुय्यम स्थान नको : डॉ.अनिता बांगर

विवाह संस्कृती परिवारातर्फे ग्रेट भेट कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

नाशिक : आजच्या आयटी युगात मुले अथवा मुली करिअर करायच्या प्रयत्नात फॅमिली प्लॅनिंगला दुय्यम स्थान देत आहेत, परंतु हे दुय्यम स्थान त्यांना वंध्यत्व

शेखर वाकचौरे टायकून अँवार्ड 2024 ने सन्मान
लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी !
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक

नाशिक : आजच्या आयटी युगात मुले अथवा मुली करिअर करायच्या प्रयत्नात फॅमिली प्लॅनिंगला दुय्यम स्थान देत आहेत, परंतु हे दुय्यम स्थान त्यांना वंध्यत्वाकडे ओढत असल्याचे प्रतिपादन डॉ. बांगर्स स्पर्श वुमन हॉस्पीटलच्या स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. अनिता बांगर यांनी केले. विवाह संस्कृती परिवार व लायन्स लिओ क्लब ऑफ नाशिक रॉयल्स् संस्थांच्या वतीने आयोजित ग्रेट भेट कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बांगर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पुणे येथील अनुरुप विवाह संस्थेच्या विवाह समुपदेशक डॉ. गौरी कानेटकर,  विवाह संस्कृती परिवाराच्या अध्यक्षा रेखा कोतकर, लायन्सचे अध्यक्ष भूषण महाजन, सौरभ शिरोडे, सचिन बागड उपस्थित होते.

डॉ. अनिता बांगर म्हणाल्या की, वंध्यत्व येण्याची कारणे ही वेगवेगळे आहेत परंतु आपल्या भारतीय समाजामध्ये या समस्येचे प्रमुख कारण स्त्रियाच मानले जातात आणि म्हणूनच अनेकदा हा एक शारीरिक आजार न राहता अनेकदा मानसिक आजार सुद्धा बनून जातो परंतु हा आजार स्त्रीला होतो तसाच पुरुषांमध्ये सुद्धा हा आजार आपल्याला पाहायला मिळतो परंतु संपूर्ण दोष स्त्रीलाच दिला जातो. ५०% पुरुष वंध्यत्वाच्या समस्येला कारणीभूत आहेत

बदललेली जीवनशैली, तणावग्रस्त जीवन, तणावग्रस्त जीवनामुळे होणारा शरीरावर परिणाम स्पर्म काउंटची कमतरता होणे, स्पर्म क्टीव्ह नसणे, स्पर्म चा आकार योग्य नसणे,फास्ट फूड अतिमद्यपान अल्कोहोलिक पदार्थ चे सेवन यासारख्या गोष्टींचा समावेश.

सध्याची परिस्थिती ताणतणावाची निर्माण झालेली आहे आणि अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या त्रास देत आहे त्यातील एक समस्या म्हणजे वंध्यत्वाची समस्या अनेक जोडते असे आहेत की त्यांना ही समस्या प्रामुख्याने उद्भवत आहे परंतु या समस्येबद्दल कोणीही काही मोकळेपणाने बोलत नाही आणि म्हणूनच ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. अनेकदा ही समस्या पुरुष किंवा स्त्रिया दोघांमध्ये असू शकते परंतु वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपण या समस्यांपासून मुक्तता मिळू शकतो. 

लक्षणं

जर पाळी व्यवस्थित वेळेवर येत नसेल, पीसीओडी समस्या,पीसीओएस समस्या त्रास देत असेल,स्पर्म काउन्ट कमी असेल, काही जेनेटिक आजार याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

या गोष्टी अवश्य करा – नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव असेल तर अशा वेळी जास्त विचार न करता आपल्या जोडीदारासोबत सकारात्मक दृष्टिकोनातून वेळ घालवा.कुठेतरी जोडीदारासोबत बाहेर जा. मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

डॉ. गौरी कानेटकर यांनी उपस्थित वधू वर व पालकांना आजच्या युगात प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगतानाच वाढत जाणाऱ्या अपेक्षा यामुळे देखील अनेक समस्या निर्माण होत असल्याचे उदाहरण देऊन सांगितले.

COMMENTS