Homeताज्या बातम्यामनोरंजन

महादेव ऑनलाइन गेमिंग अँप प्रकरणी बॉलिवुड सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर

मुंबई प्रतिनिधी - महादेव ऑनलाईन गेमिंग अँप प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. १८ सप्टेंबरला UAE मध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि पार्

इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथे वीज पडून एक बैल व एक पारडू ठार
पुढील सात दिवस फारसा पाऊस नाही; पुणे वेधशाळेचा अंदाज
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची धुरा भारताच्या हाती

मुंबई प्रतिनिधी – महादेव ऑनलाईन गेमिंग अँप प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. १८ सप्टेंबरला UAE मध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि पार्टीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांची नावं समोर आली असून त्यात सुनील शेट्टी, संजय दत्त, रश्मिका मंदाना यांच्यासह ३४ बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. हे सगळे कलाकार आता ईडीच्या रडारवर आले आहेत. UAE मध्ये झालेल्या या पार्टीत एक युट्यूब इन्फ्लुएंसर सहभागी झाला होता. त्याने त्याच्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि यात सहभागी झालेल्या कलाकारांचीही चर्चा सुरु झाली. त्यामुळेच हे कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत. सौरभ चंद्राकर या आरोपीने त्याच्या लग्नासाठी २०० कोटी तर वाढदिवस आणि पार्टीसाठी ६० कोटी रुपये खर्च केल्याचं समजतं आहे. जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात बरेच कलाकार दिसत आहेत

हे सगळे कलाकार त्या पार्टीत गेले होते असा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळेच हे कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत. महादेव बुक अँपची जाहिरात आणि प्रमोशन करणाऱ्या या सर्व कलाकार आणि गायकांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे सौरभ चंद्राकरच्या लग्नाला हजेरी लावणारे आणि वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेले आणि परफॉर्म करणारे सेलिब्रिटीच नाही तर महादेव बुक अॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणारे बॉलिवूड कलाकार आता ईडीच्या रडारवर आहेत.

कोणते कलाकार ईडीच्या रडारवर– १) दीप्ती साधवानी २) रफ्तार ३) सोनू सुद ४) सुनील शेट्टी ५) संजय दत्त ६) हार्डी संधू ७) सुनील ग्रोव्हर ८)रश्मिका मंधाना ९)सोनाक्षी सिन्हा १०)गुरु रंधावा ११) टायगर श्रॉफ १२) सारा अली खान १३) सुखविंदर सिंग १४) कपिल शर्मा १५) मलायका अरोरा १६) डिजे चेतस १७) नोरा फतेही १८) नुसरत भरुचा १९) मौनी रॉय २०) अमित त्रिवेदी २१) सोफी चौधरी २२) आफताब शिवदासानी २३) डेझी शाह २४) नर्गिस फाकरी २५) उर्वशी रौतेला २६) इशिता राज २७) नेहा शर्मा २८)स्नेहा उलाल २९) प्रीती जांगियानी ३०)शमिता शेट्टी ३१) एलनाझ ३२) सोनाली सहगल ३३) इशिता दत्ता ३४) ज्योर्जिओ अँड्रियानी

COMMENTS