अकोले/प्रतिनिधी ः ज्यांच्या अजरामर प्रक्रमाच्या महाकाय इतिहासाने होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही म्हण प्रचलित झाली. अशा आपल्या अखंड हिंदुस्थान

अकोले/प्रतिनिधी ः ज्यांच्या अजरामर प्रक्रमाच्या महाकाय इतिहासाने होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही म्हण प्रचलित झाली. अशा आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव विश्वासू अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांची 388 वा जयंती उत्सव सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. समाज कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर नाभिकरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन केले दरम्यान आज जयंती निमित्त राज्यभरातही विविध नाभिक समाजाच्या समाज कार्यकर्त्यांच्या वतीने आणि विविध स्थानिक संघटनांच्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आली सकाळी सकाळीच प्रतिमा पूजन करून प्रत्येक बांधवाने शुर वीराला विनम्र अभिवादन करून अभिवादन केले. आपल्या शूरवीरला अभिवादन तथा मानवंदना देण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष विनायक पंडित कोषाध्यक्ष विलास तुपे, वैभव शेलार, सुनील पंडित, अमोल पंडित आनंद बिडवे आदी सह मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव आणि शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
COMMENTS