नवी मुंबई प्रतिनिधी - लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. तरुणांसह, लहान मुले आणि वयोवद्धांनाही गौतमीने

नवी मुंबई प्रतिनिधी – लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. तरुणांसह, लहान मुले आणि वयोवद्धांनाही गौतमीने वेड लावलं आहे. आता गौतमीच्या नृत्याची सापालाही भूरळ पडल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात साप शिरला होता. नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमादरम्यान चक्क साप शिरला आणि गोंधळ व्हायला सुरुवात झाली. दरम्यान एका सर्पमित्राने तो साप पकडला. त्यामुळे अनर्थ टळला. अजित पवार गटाचे नेते सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. पण या कार्यक्रमात सापाने एन्ट्री घेतली आणि गौतमीच्या कार्यक्रमाची सापालाही भूरळ पडल्याच्या चर्चांना सुरुवात झाली
COMMENTS