Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंगणापूर पोस्ट विभागाची मोबाईल बँकीग सेवा दीड महिन्यांपासून बंद

कोपरगाव प्रतिनिधी ः येथील शिंगणापूर पोष्ट विभागाची मोबाईल बँकींग सुविधा बंद पडल्याने असंख्य ग्राहकांना त्याचा मनस्ताप होत आहे तेंव्हा ही सुविधा त

 मुंबईतील चित्रपट नगरी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री पळवून नेतील-  आमदार रोहित पवार 
प्रभाग रचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार
25 तलाठी कार्यालयांसाठी 5.33 कोटींची निविदा प्रसिद्ध

कोपरगाव प्रतिनिधी ः येथील शिंगणापूर पोष्ट विभागाची मोबाईल बँकींग सुविधा बंद पडल्याने असंख्य ग्राहकांना त्याचा मनस्ताप होत आहे तेंव्हा ही सुविधा तात्काळ चालु करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. सध्या डीजीटल इंडियाचा जमाना सुरू आहे. बहुतांष सेवा हया ऑनलाईन झाल्यामुळे ग्रामिण भागातील ग्राहकांना हया सुविधा मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे.
            तालुक्यातील शिंगणापुर पोष्ट विभागात इतर ग्राहकांसह शेतकरी वर्गाची आर्थीक देव घेवेसाठी मोठी गर्दी असते त्याचप्रमाणे शेजारीच साखर कारखाना, दुध संघ, अभियांत्रीकी तांत्रीक महाविद्यालय, कोपरगांव रेल्वेस्टेशन तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आदि परिसरातील ग्राहकांची येथे गर्दी असते. बहुतांष नागरिकांच्या आधार कार्ड मध्ये झालेल्या चुका दुरूस्त करण्यासाठीही शिंगणापुर पोष्ट ऑफिसशिवाय अन्य पर्याय नाही. मात्र मोबाईल कनेक्टीव्हीटीमुळे या सेवेमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत आहे. कित्येकवेळा घाईच्या कामात ग्राहकांना हताशपणे परतावे लागत आहे. मोबाईल बॅकींग सुविधा सुरळीतपणे चालू नसल्यांने ग्रामिण भागातील ग्राहक वैतागलेले असतात तेंव्हा संबंधीत विभागाने ही सेवा तात्काळ सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.

COMMENTS