Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुजबळांविरोधात दमानिया पुन्हा मैदानात

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी हायकोर्टात याचिका

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया पुन्हा एकदा मैदानात उतरल्या असून, त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ  यांच

निवडणूक आयोगाकडून अजित पवारांसह बावनकुळेना नोटीस
निफाड तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसाय तेजीत
अहमदनगर : शहरातील रस्त्यांचे खड्डे प्रकरण थेट कोर्टात

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया पुन्हा एकदा मैदानात उतरल्या असून, त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ  यांच्यावर टीकेची ताफ डागतांना, महाराष्ट्र सदन घोाळाप्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे भुजबळांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी छगन भुजबळांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार, विधिमंडळात दिलेल्या आश्‍वासनांनुसार या संदर्भातील फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकार कधी दाखल करणार? अशी विचारणा करणारी याचिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर सत्र न्यायालयाने भुजबळ, त्यांचे पुतणे समीर भुजबळ आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे विकसक मेसर्स चमणकर यांना दोषमुक्त केले होते. मात्र, या निकालावर अंजली दमानियांनी आक्षेप घेतला होता. अंजली दमानिया यांनी सरन्यायाधीशांकडे याबाबत तक्रार केली होती. अंजली दमानिया यांचे म्हणणे होते की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या कथित गैरव्यवहाराबाबत तक्रारी प्रलंबित असून तपास सुरू होता. तरीही सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भुजबळ, विकसक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तत्कालीन अधिकार्‍यांना केले. दमानिया यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात संबंधित न्यायाधीशांची बदली केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय विभागाने या संदर्भात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचा शासन निर्णय जारी केला होता. मात्र, नंतर तो शासननिर्णयही रद्द केला होता.

COMMENTS