Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ललित पाटील प्रकरणात पोलिसांनी घेतले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

पुणे/प्रतिनिधी ः कोट्यवधी रुपयांच्या ड्रग तस्करीतील प्रमुख आरोपी ललित अनिल पाटील (35) यास चाकण पोलिसांनी 20 कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीच्या गुन

थट्टा मस्करी केल्याच्या रागातून मित्रानेच केला मित्राचा खून
शेअर बाजाराचे व्यसन सोडवण्यासाठीतरुणाने धरली व्यसनमुक्ती केंद्राची वाट
प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये पेरू दाब कलम कार्यशाळा संपन्न

पुणे/प्रतिनिधी ः कोट्यवधी रुपयांच्या ड्रग तस्करीतील प्रमुख आरोपी ललित अनिल पाटील (35) यास चाकण पोलिसांनी 20 कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. मात्र उपचाराच्या नावाखाली ललित पाटील पुणे रेल्वे स्टेशननजीक ससून रुग्णालयात दाखल झाला व त्यानंतर रुग्णालयातूनच अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवले. एवढेच नव्हे तर पैशांच्या जोरावर तो रुग्णालयानजीकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नाशिकच्या प्रेयसीसोबत रासलीला करीत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी हॉटेलमधील एका महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललित पाटील नाशिकमध्ये पोहोचला आणि तेथून त्याने पलायन केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.ललित पाटील याला डिसेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असतानादेखील तो पैशांच्या जोरावर वेगवेगळ्या आजारांची कारणे सांगून ससून रुग्णालयात आतापर्यंत 16 महिने राहिलेला आहे.

COMMENTS