Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आझम पानसरे यांची शरद पवारांना साथ

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदारांनी अजित पवार गटाची सोबत केली आहे. मात्र अनेक कट्टर कार्यकर्ते शरद पवारा

शिक्षणाविषयी उदासीनता
गुजरात मधील आणंद जिल्ह्यात भीषण अपघात
पाथर्डीतील खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदारांनी अजित पवार गटाची सोबत केली आहे. मात्र अनेक कट्टर कार्यकर्ते शरद पवारांची साथ सोडण्यात तयार नाही. तसेच अनेक नेत्यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. अजितदादांसोबत की शरद पवारांना साथ? याविषयी अनेक नेत्यांबाबत अजूनही संभ्रम आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते व पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली व बंद दाराआड चर्चा झाली.
पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आझम पानसरेंचे चांगले वजन असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे थोरल्या साहेबांनी पिंपरी चिंचवडच्या राजकारणाकडे लक्ष देत आझम पानसरे यांची भेट घेतल्याने अजित पवार गटाने धसका घेतल्याचे मानले जात आहे. आझम पानसरे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची खिंड अनेकदा लढवली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आझम पानसरेंचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना मानणारा गट मोठा असल्याचे मानले जाते. अजितदादांच्या बंडानंतर आझम पानसरे अजितदादांसोबत जाणार की शरद पवारांसोबत असा संभ्रम पिंपरी चिंचवड शहरात होता. मात्र, रविवारी पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी पानसरे यांनी पवारांची भेट घेत हा संभ्रम दूर केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, ’’राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना मानणारा मोठा गट नेते या शहरांमध्ये आहेत. साहेबांनी शहराचा विकास केलेला आहे. त्यामुळे विकासाचे खरे साक्षीदार ज्येष्ठ नेते हे साहेबांबरोबर आहेत. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी आज सकाळी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योग्य संधी मिळत नसल्याचे कारण सांगत आझम पानसरे यांनी भाजपशीही घरोबा केला होता. चवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आझम पानसरे यांचा भाजप प्रवेश घडवून आणला होता. मात्र, तेथेही त्यांची निराशा झाल्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतले होते.

COMMENTS