Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये पुन्हा 11 रुग्णांचा मृत्यू

मृतांमध्ये 3 नवजात बालकांचा समावेश

नांदेड/प्रतिनिधी ः नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या अजूनही काही कमी होतांना दिसून येत नाही. याप्रकरणी अधिष्ठाता य

परमबीरविरोधात दहा कोटीची लाच मागितल्याचा आरोप
कल्याण इमारतीच्या टेरेस वरील मोबाईल टॉवरला आग
दुथडी वाहणार्‍या गोदातिरी साकारला श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग

नांदेड/प्रतिनिधी ः नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या अजूनही काही कमी होतांना दिसून येत नाही. याप्रकरणी अधिष्ठाता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतरही या रुग्णालयांतील मृतांचा आकडा थांबण्याची चिन्हे नाहीत. गेल्या 24 तासांमध्ये पुन्हा 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये 3 नवजात बालकांचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्य सरकार या रुग्णालयांतील मृत्यू अजूनही न थांबवू शकल्याचे वास्तव्य आहे. या रुग्णालयात एकाच दिवसात मृत्यूचा आकडा वाढल्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सध्या रोजची आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार या रुग्णालयात गेल्या 24 तासात एकूण 819 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतले.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत 768 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच ि4 ते 5 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकूण 136 नवीन रुग्णांची भरती झाली आहे. या 24 तासात 134 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 11 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 3 नवजात बालक (पुरुष जातीचे 1, स्त्री जातीचे 2) व बालक 1 (स्त्री जातीचे) व प्रौढ 7 (पुरुष जातीचे 6, स्त्री जातीचे 1) यांचा समावेश आहे. गत 24 तासात एकूण 47 शस्त्रक्रिया झाल्या. यात 34 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 13 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 23 प्रसुती करण्यात आल्या. यात 9 सीझर होत्या तर 14 नॉर्मल प्रसुती झाल्या, अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

COMMENTS