नाशिक प्रतिनिधी - नाशिक महापालिकेत गेल्या २४ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. महापालिकेचा आकृतिबंध हा वर्गसंवर्गानुसार असून, ७०९२ पदे मंजूर असून
नाशिक प्रतिनिधी – नाशिक महापालिकेत गेल्या २४ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. महापालिकेचा आकृतिबंध हा वर्गसंवर्गानुसार असून, ७०९२ पदे मंजूर असून, त्यात अडीच हजार पदे रिक्त आहेत. दरम्यान, होऊ घातलेल्या नोकरभरतीत कंत्राटी कामगारांना व स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, तसेच पालिका रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने असलेल्या डॉक्टरांना कायम करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले शहराचा विस्तार होत की, असताना २४ खेड्यांमध्ये इमारती उभ्या राहिल्यामुळे लोकसंख्याही वाढली आहे. २०११ मध्ये १४ लाखांपर्यंत मर्यादित असलेली लोकसंख्या सध्या २२ लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे नागरी सुविधा पुरवण्यामध्ये महापालिका मनुष्यबळ नसल्याचे कारण दिले जाते. तांत्रिक संवर्गानुसार परीक्षेचे स्वरूप तयार केले असून, आयुक्तांच्या मान्यतेनंतर टीसीएसला पाठवले जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये साधारणतः मंजूर पदांच्या भरतीप्रक्रियेला सुरुवात होईल. भरती जरी टीसीएस कंपनी करणार असली तरी परीक्षेचा फॉरमॅट महापालिका ठरवून देणार आहे. त्यामुळे टीसीएस कंपनीच्या पत्रानुसार वैद्यकीय, अग्रिशमन आणि घनकचरा विभागाकडून इच्छुकांच्या परीक्षेसाठी सराव परीक्षेचा फॉरमेंट देण्याचे आदेश तीन विभागांना दिले होते. त्यानुसार या तीनही विभागांनी उमेदवारांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा फॉरमेंट प्रशासन उपायुक्तांकडे सादर करण्यात आल्या.
भरती प्रकरणी अद्यापही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. नाशिकच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या लोकसंख्येचा प्रभाव पडत आहे. मनपाकडे कमी मनुष्यबळ असल्याने सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा नेहमीच चर्चिला येत असतो. कोविड काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर निर्माण झालेला भार लक्षात घेता तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदभरती कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर करण्यात आली होती. मात्र, या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन अदा न करणे, तसेच विहित कालावधीकरिता करारबद्ध न करणे अशा स्वरूपाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचे आरोग्य प्रभावित झाले. अनेक रुग्णांना आवश्यक आरोग्यसेवा केवळ अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे.
या समस्येवर उपाययोजना करण्याऐवजी हेतुपुरस्सर कानाडोळा करण्याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी धन्यता मानत आहेत. यापूर्वीही वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनातील अधिकारी वर्गाने नेहमीच उदासीन धोरण अवलंबले आहे. या प्रकरणाची एक दक्ष लोकसेवक म्हणून दखल घेणार आहात अथवा नाही, की आवश्यक नागरी सुविधा रामभरोसे सोडणार आहात, याचे उत्तर कृपया सकारात्मक कार्यवाहीतून नाशिककरांना द्यावे, पुढील आठ दिवसांत प्रशासनाने प्रस्तावित नोकरभरतीबाबत विहित कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा आणि नोकरभरती प्रक्रिया लवकर सुरू करावी. तसेच सद्यस्थितीत कार्यरत कंत्राटी कामगारांना व स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, केलेल्या मागणीचा विचार न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.
COMMENTS