Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीत कुणाचे पारडे ठरणार जड

निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सर्वाधिक आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला असून, अजित पवार गटाने देखील शिंदे

वैराग्याच्या काळातही पवारांची बगल में छुरी
ऊसतोड कामगारांची नोंदणी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण करण्याचे आवाहन
पालकमंत्री घेणार अखेर जिल्ह्यातील कोविडचा आढावा

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सर्वाधिक आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला असून, अजित पवार गटाने देखील शिंदे गटासारखीच खेळी करत पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची ? यावर लवकरच फैसला होणार असून, आज शुक्रवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.
या सुनावणीमध्ये आपले पारडे जड ठरण्यासाठी दोन्ही गटांकडून रणनीती आखण्यात येत असून, त्याचाच एक म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँगे्रसने अजित पवारांच्या गटापेक्षा जास्त म्हणजे 9 हजारांच्या जवळपास शपथपत्र दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीत शरद की अजित पवार या दोन्ही नेत्यांपकी कुणाचे पारडे जड? अशी चर्चा रंगली आहे. पक्षात फूट पडल्यानंतरही शरद पवारांनी आपल्या पक्षात कोणतीही फूूट पडली नसल्याचा दावा केला होता. केवळ काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे ती फूट नसल्याचा पवित्रा शरद पवारांनी घेतला होता. मात्र अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे यावर सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्हाच्या मुद्यावरील ही पहिली सुनावणी असेल. त्यामुळे या सुनावणीसाठी दोन्ही गटांनी जोरकसपणे तयारी केली आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाने या सुनावणीसाठी जवळपास 9 हजार शपथपत्र सादर केल्याची माहिती आहे. हा आकडा अजित पवार गटाने दाखल केलेल्या दस्तावेजांपेक्षा जास्त असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शरद पवार गट अजित पवारांच्या गटाने सादर केलेल्या कागदपत्रांतील त्रुटीही दाखवून देणार आहे.

शरद पवार गटाने 8 ते 9 हजार शपथपत्र केले सादर – शरद पवार गट आजच्या सुनावणीत आयोगापुढे सुमारे 8 ते 9 हजार शपथपत्र सादर करणार असल्याची माहिती आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना व्यक्तिशः उपस्थित राहण्याची गरज नाही. पण दोन्ही गटाचे दुसर्‍या फळीतील नेते या सुनावणीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने या मुद्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्बलमध्ये पक्षाच्या कार्य समितीची एक बैठकही बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक चिन्ह गोठवले गेले किंवा आयोगाचा निर्णय विरोधात गेला तर त्याचे काय परिणाम होतील किंवा पुढे कोणते पाऊल उचलायचे यावर विचारमंथन केले जाणार आहे.

70 जणांच्या संमतीनंतर अध्यक्षपदी निवड ः शरद पवार – राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलतांना शरद पवारांनी अजित पवार गटावर सडकून केली.तालकटोरा येथील पक्षाच्या बैठकीचा आणि निवडणुकाचा उल्लेख करत अनेक सवाल उपस्थित केले. यावेळी शरद पवारांनी तालकटोरा येथील बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 70 जणांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव देत स्वाक्षर्‍या केल्याचेही सांगितले. मजेची गोष्ट म्हणजे तालकटोरा येथे जी पक्षाची बैठक झाली तेथे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तेथे निवडणूक घेण्याची जबाबदारी ‘रिटर्निंग ऑफिसर’कडे होती. त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया कशी असेल ते सर्वांसमोर सांगितले. तसेच दोन दिवसांचा वेळ दिला. त्यानंतर 70 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यात एकच नाव दिले, ते म्हणजे माझे नाव, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

COMMENTS