Homeताज्या बातम्यादेश

दिवाळीआधी गरिबांना मोदी सरकारचं ‘गिफ्ट’; अवघ्या ६०० रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर

नवी दिल्ली प्रतिनिधी - एलपीजी सिलिंडरबाबत  मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या न

बाणेरमध्ये टाकीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू
ओबीसी नेत्यांचे खून करण्यामागे आर‌एस‌एस का?
मुलांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात; मुलींच्या हरियाणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशचे संघ विजयी

नवी दिल्ली प्रतिनिधी – एलपीजी सिलिंडरबाबत  मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवळ 600 रूपयांत मिळणार आहे. सरकारने गॅस सिलिंडरवरील अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना अवघ्या 600 रुपयात सिलिंडर मिळणार आहे, अशी माहिती  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. ते कॅबिनेटनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दसरा आणि दिवाळीपूर्वी मोदी सरकारने मोठा निर्णय घेत सर्व सामान्यांना मोठं गिफ्ट दिले आहे.अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम 200 रुपयांवरून 300 रुपये प्रति सिलिंडरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी या सिलिंडरसाठी ग्राहकांना 700 रूपये मोजावे लागत होते. मात्र, आता अनुदानाची रक्कम वाढवण्यात आल्याने सिलिंडरसाठी ग्राहकांना केवळ 600 रुपये मोजावे लागणार आहेत.

COMMENTS