Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओझर नगरपरिषदेस पुर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा  

ओझरचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ओझर प्रतिनिधी - निफाड तालुक्यातील ओझर  ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्यापासून आजपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याने ओझर सारख्या

काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचा दिलासा
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
मालाडमध्ये अनेक झोपड्या जळून खाक

ओझर प्रतिनिधी – निफाड तालुक्यातील ओझर  ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्यापासून आजपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याने ओझर सारख्या मोठ्या शहराची अवस्था बिकट झाली असून ओझर शहर विकासापासून वंचित रहात आहे त्यामुळे ओझर सारख्या मोठ्या शहराला  पुर्ववेळ मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी ओझर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ओझर मर्चंट बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे 

     त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ओझर या शहराची सन २०११ च्या जणगणणेनुसार सुमारे ५४,०६९ इतकी लोकसंख्या असुन आजमितीस ओझर शहराची वाढता विस्तार बघता सदरची लोकसंख्या ७५,००० च्या पुढे गेलेली आहे. सुमारे दिड ते दोन वर्षापुर्वी ओझर ग्रामपंचायतचे रूपांतर होऊन नगरपरिषद अस्तित्वात आली. त्यानंतर नगरपरिषदेवर मुख्य अधिकारी म्हणुन ज्या अधिका-याची नेमणुक झाली त्या अधिका-याकडे इतर कोण्यातरी  नगरपरिषदेंचा कार्यभार असतो तसेच ओझर नागरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार असतो त्यामुळे संबधित अधिका-याला ओझर सारख्या मोठ्या शहरात वेळ देता येत नाही सद्यस्थितीत ओझर नगरपरिषदेच मुख्याधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार असणाऱ्या डॉ किरण देशमुख यांच्या कडे येवला नगरपरिषदेचा पदभार आहे एकाच वेळी अधिकारी दोन मोठ्या शहराना पुरेशा वेळ देऊ शकत नसल्याने मुख्याधिकारी ओझर गावात कमी वेळा उपलब्ध राहतात त्यामुळे ओझरच्या नागरिकांना आपली कामे करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो  तसेच पुर्ण वेळ मुख्य अधिकारी नसल्यामुळे पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन  मुलभुत गरजा पुरवताना कर्माचा-यांना येणाऱ्या अडचणीवर लवकर मार्ग निघत नाही  .अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी नगरपरिषदेत हेलपाटे मारावा लागतात त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे .यासर्व बाबीचा विचार करता वओझर शहराचा वाढता विस्तार बघता ओझर शहरास पुर्ण वेळ मुख्य अधिका-याची नेमणुक होणे आवश्यक आहे.  तरी ओझर नगरपरिषदेस पुर्ण वेळ मुख्य अधिकारी मिळावा व नागरिकांची गैरसोय दूर करावी  अशी मागणी राजेंद्र शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली

COMMENTS