सातारा / प्रतिनिधी : ग्रामपंचायत यशवंतनगर आणि शेंदुरजणे, ता. वाई तर ग्रामपंचायत समर्थनगर, काशीळ त. सातारा यांच्या हद्दीतील अनाधिकृत बांधकामे अस
सातारा / प्रतिनिधी : ग्रामपंचायत यशवंतनगर आणि शेंदुरजणे, ता. वाई तर ग्रामपंचायत समर्थनगर, काशीळ त. सातारा यांच्या हद्दीतील अनाधिकृत बांधकामे असल्याची पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकार्यांनी दखल घेतली नाही. 2 ऑक्टोबरपासून विविध तक्रारी करुन ही कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषणाला बसलो असता पहिल्याच दिवशी वाई तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीनी 63,493 चौ. फु. एवढे अनाधिकृत बांधकामे असून त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 124 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिले. तक्रार करून दखल घेतली नाही मात्र, उपोषणाला बसलो की संबंधित ग्रामपंचायतींनी कारवाई केली. यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना हजारो रुपयांचा ग्रामनिधी मिळाल्याचे समाधान असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.
वाई तालुक्यातील यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील आर्या मंगल कार्यालयाचे 1,319 चौ. फु. तर मधुरा गार्डनचे 19899 चौ. फु. क्षेत्रफळ अधिक केलेले विनापरवाना बांधकाम असल्याचे वाई गटविकास अधिकारी यांनी लेखी दिले. ग्रामपंचायत समर्थनगर (ता. सातारा) येथील नवनाथ बर्वे, रेणुका बर्वे यांनी विनापरवाना केलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच काशीळ येथील शनेरुबी मंजिल या बांधकामाबाबत सिकंदर शेख यांना नोटीस देऊन अनधिकृत बांधकामे पडणेकामी आदेश दिले आहेत. शेंदुरजणे ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या मॅप्रो फुडस कंपनीने केलेल्या वाढीव अनाधिकृत बांधकामाची मोजमापे घेतली असता तब्बल 42,275 चौ. फु. असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी सदर कंपनी रु. 5,41,127 इतकी वार्षिक घरपट्टी भरत होती. त्याबाबत तक्रार आणि उपोषण केल्याने अजून लाखो रुपयांची भर पडली असून ग्रामपंचायतीच्या निधीत वाढ झाली आहे. मात्र, माप्रो कंपनीचे एसटीपी प्लॅनबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई न केलेले उपोषण या विषयी सुरूच राहणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, सातारा, वाईचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकार्यांनी प्रत्येक तक्रारींची दखल घेतल्याने हा निपटारा झाला असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.
COMMENTS