Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेच्या धक्क्याने तरूण उद्योजकाचा मृत्यू

जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील घटना

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शुभम गोकुळ दाताळ (वय 24) या तरूण उद्योजकाचा विजेच्या मुख्य वाहिनीचा झटका लागुन  दुर्दैवी मृ

टाकळी गावाचे सुपुत्र प्रशांत पाईक यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड
पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जणांची धडपड
काकडे महाविद्यालयात अविष्कार संशोधन स्पर्धेत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शुभम गोकुळ दाताळ (वय 24) या तरूण उद्योजकाचा विजेच्या मुख्य वाहिनीचा झटका लागुन  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडील गोकुळ दाताळ हे या घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेमुळे खर्डा व बाळगव्हाण परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
रविवारी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 ते 5 वाजे दरम्यान मयत तरूण शुभम गोकुळ दाताळ व त्याचे वडील आपल्या स्वतःच्या पोल्ट्री फार्मच्या शेड जवळील लाईटचा सप्लाय बंद असल्याने डीपी जवळील लाईनला डिओ टाकत होते. अचानकपणे त्यांच्या हातातील लोखंडी पाईप मेन लाईनला लागल्याने जबर करंट बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर जवळ उभे असणारे त्यांच्या वडिलांना करंट बसून बाजूला फेकल्याने जखमी झाले. मयत तरूण शुभम दाताळ हे इलेक्ट्रिक इंजिनिअर पदवी घेऊन नोकरी न करता स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय करत होते. शुभम दाताळ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खर्डा  परिसरात नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या मागे आई-वडील, आज्जी, एक भाऊ असा परिवार आहे.

COMMENTS