Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपक तनपुरे मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील युवा नेतृत्व प्रगतशील शेतकरी दीपक वसंतराव तनपुरे पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाचे दक्षिण विभागाच्या

फळबागांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करा
बंधार्‍यावरून लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेरबंद
शरणपूर वृद्धाश्रमात आजी-आजोबांना मिष्टान्न भोजन  

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील युवा नेतृत्व प्रगतशील शेतकरी दीपक वसंतराव तनपुरे पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाचे दक्षिण विभागाच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढंरे यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात तनपुरे यांना प्रदान केले.
मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व युवा उद्योजक शेतकरी विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा नुकताच शिर्डी येथे संपन्न झाला या वेळी नगर जिल्ह्यातील अनेक तरुणांना मराठा महासंघात काम करण्याची संधी देण्यात आली नगर जिल्ह्यात सक्षम मराठा महासंघाची सर्वच क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विविध विभागांत काम करण्याची संधी देऊन तरुणांची फळी उभी करण्याचीतयारी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढंरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. नगर दक्षिण विभाग मराठा महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीत नव्याने जिल्हा उपाध्यक्ष पदांची जबाबदारी राहुरी येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते दीपक वसंतराव तनपुरे यांच्या कडे देण्यात आली आहे निवडीचे पत्र नुकतेच देण्यात आले या निवडी बद्दल तनपुरे यांचे अभिनंदन राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढंरे, उपाध्यक्ष ना नरेंद्र पाटील, वसंतराव मुळीक, विनायक पवार, सरचिटणीस प्रकाश देशमुख, कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, गुलाब गायकवाड, अतिष गायकवाड, महीला प्रतिनिधी भारती पाटील नाशिक विभागीय पदाधिकारी, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक अरुण राव तनपुरे, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले, सरचिटणीस रमेश बोरुडे, राहुरी तालुका अध्यक्ष दिनकर पवार, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र काळे शहराध्यक्ष प्रदीप भुजाडी, जिल्हा वकील सेल अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण भिंगारदे, तालुका कार्याध्यक्ष विलास वराळे, रावसाहेब शंकर तनपुरे, योगेश निकम,शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष साळभाऊ नरवडे, संभाजी शिरसाठ, प्रभाकर काळे, मधुकर भुजाडी, अ‍ॅड संदिप भोंगळ, तसेच राहुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.

COMMENTS