पाटणा: बिहार सरकारकडून करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. बिहार सरकारचे अप्पर मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी ह
पाटणा: बिहार सरकारकडून करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. बिहार सरकारचे अप्पर मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी हा रिपोर्ट प्रसिद्ध करताना सांगितले की, बिहारची एकूण लोकसंख्या 13 कोटीहून अधिक आहे. त्याचबरोबर सांगितले की, कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे. बिहार सरकारने सोमवारी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्याचबरोबर जातनिहाह जणगणनेची आकडेवारी प्रसिद्ध करणारे बिहार देशातील पहिलेच राज्य बनले आहे. बिहारमध्ये मागास प्रवर्ग 36 टक्के, इतर मागास वर्ग (ओबीसी) 27 टक्के. यादव 14.26 टक्के, ब्राह्मण 3.65 टक्के राजपूत (ठाकुर) 3.45 टक्के तर सर्वात कमी लोकसंख्या कायस्थांनी 0.60 टक्के आहे.
COMMENTS