मुंबई/प्रतिनिधी ः नुकताच गणेशोत्सव संपला असून, अनेक मंडळांनी भक्तांनी केलेल्या दानाची मोजदाद करण्यात येत आहे. यामध्ये मुंबईतील ‘लालबागच्या राजा’च
मुंबई/प्रतिनिधी ः नुकताच गणेशोत्सव संपला असून, अनेक मंडळांनी भक्तांनी केलेल्या दानाची मोजदाद करण्यात येत आहे. यामध्ये मुंबईतील ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी भरभरून दान केले असून, यामध्ये तब्बल साडे तीन किलोचा समावेश आहे.
लालबागच्या दर्शनासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या वर्षीदेखील लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. या सर्व भाविकांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोट्यवधींचे दान अर्पण केले आहे. यात अडीच कोटींच्या सोने आणि चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. इतकेच नाही तर एका भाविकाने ई-दुचाकी देखील राजाच्या रचना अर्पण केली आहे. या सर्व वस्तूंचा ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’तर्फे जाहीर लिलाव करण्यात आला. देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात तर गणेशोत्सवाची धूम असते. मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी राजकारणासहीत सर्वच क्षेत्रातील भाविकांची मोठी उपस्थिती असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवस जगभरातून नवसाला पावणारा म्हणून ख्याती असणार्या ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी लोक येत असतात. यंदा या भाविकांनी अंदाजे अडीच कोटींच्या सोने आणि चांदीच्या वस्तू लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केल्या आहेत. यासोबतच 5 कोटी, सोळा लाख इतकी रोख रक्कम या भाविकांनी अर्पण केली आहे. तर एका भाविकाने इलेक्ट्रिक दुचाकी अर्पण केली आहे. सर्व चांदी आणि सोन्याच्या वस्तूंचा जाहीर लिलाव ‘लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळा’तर्फे करण्यात आला. यातील एकेका वस्तूसाठी लाखोंची बोली लावण्यात आली. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा सर्व पैसा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध उपक्रमासाठी खर्च करण्यात येतो. सोन्यामध्ये गणपतीला साडेतीन किलोच्या सोन्याच्या वस्तू अर्पण करण्यात आल्या. यात मुकुट, झुंबर, छत्री, जास्वंदी हार, अंगठी, चैन, बांगडी, गणेशमूर्ती, इमारतीची प्रतिकृती, उंदीर यांचा समावेश आहे. तर चांदीमध्ये तब्बल 64 किलो चांदीच्या वस्तू अर्पण करण्यात आल्या आहेत. यामध्ये चांदीचा पाट, भव्य मोदक, गणेशमूर्ती, छत्री, मुकुट, केळीचे पान, चांदीच्या केळी आणि प्रसाद, नारळ, कलश, घंगाळे, समई, जास्वंदीचे फूल अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.
COMMENTS